Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आम्हीही सावित्रीच्याच लेकी होतो परंतु शिक्षक बँकेने आम्हाला दिली सावत्र लेकीची वागणूक ; एका पुरस्कारावरचा खर्च तब्बल ७ हजार - मिनाक्षी तांबे


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२४ : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने शताब्दी वर्षा निमित्त जिल्हाभरातील साडे चार हजार महिला शिक्षिकांपैकी एका तालुक्यातील १० शिक्षिका याप्रमाणे १४० महिलांनाच क्रांतिज्योति सावित्रीच्या लेकी पुरस्काराने गौरविले. आमचा या पुरस्कार देण्याला अजिबात विरोध नव्हता व नाही परंतु जिल्ह्यात साडेचार हजार महिला शिक्षिकांपैकी १४० महिला शिक्षिका निवडताना कोणते निकष लावण्यात आले होते. जिल्हयातील उर्वरित बँकेच्या सभासद असलेल्या महिला शिक्षिकांना मात्र शिक्षक बँकेने सावत्रपणाची वागणूक दिली आहे. याबाबत जिल्हयातील महिला भगिनींमध्ये असंतोष खदखदत आहे. येणाऱ्या काळात आम्ही वेळ येईल तेंव्हा निश्चीत बँकेच्या सत्ताधाऱ्यांना महिला शक्तीचा हिसका दाखवू.
पुरस्कार जर शिक्षक बँकेने दिले होते व पुरस्कारासाठी बँकेचे सभासदत्व हाच एकमेव निकष होता तर मग ४५०० महिला शिक्षिकाही शिक्षक बँकेच्याच सभासद होत्या.त्यातील अनेकींनी तुम्हालाच मतदान केले होते. मग त्यांना डावलताना त्या काय बँकेच्या सावत्र लेकी होत्या काय ? असा जळजळीत सवाल शिक्षक परिषद गुरूमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मिनाक्षी तांबे यांनी बँकेतील सत्तारूढ मंडळाला केला आहे.
पुरस्काराशिवाय कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. याची जाणीव बँकेच्या धुर्त सत्ताधारी नेत्याला होती.मग एका शिक्षिकेला पुरस्कार दिला तर त्यांचे कुटूंबिय व मित्रपरिवार यांसह दहा व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित राहतील या हेतूने दिडहजाराच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल म्हणूनच १४० पुरस्कार वाटले. परंतु पुरस्कार वितरण कार्यक्रमावर जवळजवळ दहा लाख रूपयांचा खर्च सत्ताधा-यांनी दाखवला आहे. म्हणजेच प्रति पुरस्कार एक फेटा व प्रमाणपत्रावर तब्बल ७१५० रूपये खर्चाची उधळपट्टी सत्ताधारी नेत्याने स्वत:ची प्रतिमा जिल्हयाचा नेता म्हणून उजळवण्याकरिता केलेली अाहे. पुरस्कार्थी निवड करताना आपल्या अत्यंत निकटवर्ती कार्यकर्त्यांना संधी दिली गेली.
म्हणजेच सर्व सामान्य वाडी वस्तीवर काम करणा-या महिला शिक्षिकांना जाणीवपुर्वक डावलल्यामुळे जिल्ह्यातील साडेचार हजार महिला शिक्षिकांची तर या कार्यक्रमाविषयी खदखद होतीच परंतु कार्यक्रमावर केलेल्या अव्वा च्या सव्वा खर्चामुळे कार्यक्रमाचा नेमका उद्देश कार्यक्रमाआडून माया जमवण्याचा होता की काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडल्याची खंत मिनाक्षी तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments