Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तालुक्यातील छावणी चालकांचे उर्वरीत बिले लवकर अदा करावीत ; भाजपा नगर तालुक्याची जिल्हाधिकारी यांना मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१२ - मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती मध्ये नगर तालुक्यात शासनाने सुरू केलेल्या जनावरांच्या छावण्यांचे देयके वर्ष होऊन गेले तरी अद्याप मिळालेली नाहीत, या संदर्भात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने शुक्रवारी (दि.१२) निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांच्यासह पोपट शेळके, सचिन लांडगे, राजू दारकुंडे सुभाष निमसे, महेश लांडगे, अनिल शेडाळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.बेरड यांनी सांगितले की, भाजप सरकारने मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमध्ये चारा छावण्यासुरु करुन पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा दिला, भाजप सरकारच्या काळात सुरुवातीला काही प्रमाणात बिल पण अदा केले परंतु त्यांच छावणीचालकाचे बिल देण्यास सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार टाळटाळ करत आहे, वर्ष उलटून गेलेले असून देखील छावणी चांलकांना देयके भेटत नसल्यामुळे छावणीचालक त्रस्त झालेले आहेत.
तालुक्यातील जवळपास सर्वच छावणीचालक हे शेतकरी असून सध्याच्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी अडचणीत असताना निवेदनाची दखक घेऊन छावणी चालकांचे देयके ताबडतोब अदा न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे तालुक्यातील छावणी चालकांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments