आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - एमआयडीसीतील वैभव सेलचे मालक वैभव शेटीया हे घरी चालले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर गावठी कट्टा रोखून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात शेटिया हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सावेडीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वैभव सेलचे मालक वैभव शेटीया यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे तिघे असून ते मोटरसायकलीवर आले होते. शेटीया यांच्यावर पाळत ठेवून तिघा भामट्यांनी चार लाख वीस हजार रुपयांची रोकड व अंदाजे एक तोळा सोन्याचे अंगठी लांबविली. चोरट्यांनी सुमारे पाच लाखांचा ऐवज लुटून नेला आहे. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत शेटिया यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्यावर गावठी पिस्तूल मारहाण केल्याने त्यांना पंधरा टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टर सागर बोरुडे यांनी सांगितले. दरम्यान, नगरसेवक विपुल शेटीया यांच्या अनेक समर्थकांनी रुग्णालय बाहेर मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख अखीलेशकुमार सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख सागर पाटील, पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शेटीया दाखल असलेल्या रुग्णालयास भेट देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
0 Comments