Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२०- अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी सागर आनंद साळवे (वय २०, रा.दैठणेगुंजाळ ता.पारनेर जि.अ.नगर) याला जिल्हा न्यायाधीश क्र.१२ प्रविण व्ही. चतुर यांनी भा.द.वि.कलम ३६३, ३६६ अन्वये दोषी धरून ७ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रु.दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठवली.


दि.२० फेब्रुवारी २०१७ ला अल्पवयीन मुलगीचे वय १४ वर्षे ७ महिने ही शाळेतून दुपारच्या सुट्टीत तिच्या मैत्रीणकडे गेली होती. यावेळी आरोपी सागर साळवे याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. याबाबत अल्पवयीन मुलीचे मामा यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तद्नंतर आरोपी सागर साळवे व अल्पवयीन मुलगी यांना पोलिसांनी श्रीगोंदा येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात पोसई अहिरे यांनी दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश क्र.१२ प्रविण व्ही. चतुर यांच्या समोर झाली. खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी वकील मनिषा पी केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. खटल्यात सयकारी पक्षाच्या वतीने ७ साक्षीदार तपासण्या आले. सदर खटल्यात पिडीत मुलगी, पिडीत मुलीचे फिर्यादी मामा, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, दैठणेगुंजाळ ग्रामसेवक व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुरावा, कागदपत्रे पुरवा तसेच विशेष सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी वकील मनिषा पी केळगंद्रे-शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी धरले व ७ वर्षे सक्तमजुरी, १ हजार रु.दंड, न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
खटल्याच्या सुनावणी दरम्यान,पैरवी अधिकारी पोहेकाँ माळी यांनी विशेष सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी वकील मनिषा पी केळगंद्रे-शिंदे यांना मदत केली.

Post a Comment

0 Comments