Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दीड हजार रुपये द्या, हॉटेल गुपचूप सुरु करा,वा रे वा, ही माहिती मिडियास समजताच सर्व बंद .... नगर तालुक्याचा सावळगोंधळ


 महामार्गवरील घटना एकाच्या कानावर पडली अन्, माशी शिंकली, बीटवाल्यातर्फे हॉटेलवाल्यांना सावधानतेचा इशारा..
आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.१७ : जिल्ह्यातील महामार्गावर दीड हजार द्या, आणि चालू द्या हाँटेल ! ही बातमी चक्क काही पत्रकारापर्यंत पोहोचली. ती बातमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोका वाढू नये, यासाठी ती बातमी देऊन कारवाई व्हावी, या उद्देशाने समोरील एकास सांगितली, पण या घडामोडींची कुठेतरी माशी शिंकली आणि, 'त्या' पोलीस ठाणे हद्दीतील बीटवाल्याने जामखेड महामार्गावर नगर तालुका हद्दीत येणाऱ्या हाँटेलवाल्यांना सावधानतेचा इशारा दिला. हाँटेलात चोरीचुपकी सुरु असणाऱ्या जेवण, मद्य विक्री दोन-चार दिवस बंदच ठेवा, असे सूचकात दर्शविली. एसपी साहेब जिल्ह्यात असेच चालू राहिले तर, या सर्व घडामोडींची मालिका तुमच्या माथी मारुन मोकळे होतील. यानंतरची घडामोडी कदाचित आपल्यासमोरही येतील. तत्पूर्वी आपणास प्रथम जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत मलमपट्टी करण्यास सुरुवात करावी. नाहीतर आपणास सांगितले जाईल वेगळे आणि प्रत्यक्षात घडते वेगळे!. एखादी बातमी फुटणे ही बाब पोलीस दलास लार्जीवाणी आहे.नगर तालुक्यातील अनेक हॉटेलमध्ये छुप्या पद्धितीने जेवण व मद्य विक्री होत होती, यात सोशल डिस्टंन्साचे उल्लंघन होत होते. पोलीस काही करत नाहीत तुम्ही बसा फक्त आरडाओरडा करु नका असा सल्ला देत हॉटेल चालक मद्यपिंची मैफिल रंगवणताना चालू होत्या. हे सर्व चालू ठेवण्यासाठी आम्ही (हाँटेल चालक) दीड हजार रुपये दिले आहेत.कोणी येणार नाही, ईकडे. तुम्ही भिऊ नका, असा सूचक सल्ला ग्राहकांना हॉटेलमालक देत होते. हा घटनाक्रम दोन दिवशीही सुरु होता. यापूर्वी सर्रास लाँकडाऊनच्या काळातही सुरू होता. गांभीर्याने विचार केल्यास ग्रामीण भागात जर कोरोनासारख्या आजाराचा फैलाव झाला तर मोठ्या प्रमाणावर परिस्थिती गंभीर होऊ शकतो. या घटनेचा आँखोदेखो नजरा अनेक सुज्ञ नागरिकांनी या घटनेची माहिती काही पत्रकाराला दिली, परंतु मिडियातील सहकार्यांनी ती बातमी प्रकाशझोत आणण्यापेक्षा अंधारात ठेवणे पसंत केले, असो! 
नगर पाथर्डी रोड,नगर जामखेडरोड, सोलापूररोड या रोडवरील हॉटेलवर मद्यविक्री व जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे उल्लंघन करुन राजरोसपणे हॉटेल गुपचूप सुरु होते. मात्र पोलीस बघ्याची भुमिका घेत असल्याने पोलीसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होता. सध्या मुंबई -पुणे येथून नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करत आहेत. अश्यातच हे नागरिकही हॉटेलवर थांबून जेवणाचा आस्वाद घेऊन अनेकांच्या जिवाशी खेळ सुरु होता.
मैफिल रंगवताना काही अडचण तर येणार नाही ? असा प्रश्न विचारल्यावर दीड हजार रुपये काय फुकट दिले आहेत का, असे उत्तर मिळाले. तुम्ही बसा कोणी काही करत नाही, असा सल्ला अनेकांना हॉटेल मालक देत होते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गुपचूप सुरु असलेल्या हॉटेल चालकांनवर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरु लागली. दरम्यान, साहेबांच्या (हप्ते वसुली करणारा) कलेक्टरांपर्यत दीड हजारांची रुपयांची माहिती जाऊ देऊ नका.नाहीतर आहे, ते पण बंद करु असा गुपचूप त्या संबंधित हाँटेल चालकाला 'दम' पण दिला. पण तो पुन्हा सावरासावर करून सुरु ठेवा,आमच्यातही खूप वाद आहेत. ते तुम्हाला सांगण्यासारखे नाहीत. तुम्ही आपले माणस आहात, दीड हजार रुपयात तुमच हॉटेल सुरु होतय.तुम्हीही कमवा आम्हालाही कमवू द्या, असा मस्त सल्ला दिल्याने दादा तुम्ही लय भारी आहात, अस म्हणत हॉटेल मालकांच्या तोंडून सध्या या पोलिसदादांचे गोड गोड बोल ऐकायला मिळले. ही सर्व बाब सूज्ञ नागरिकांनी एका पत्रकार पर्यंत पोहचवली. ही बाब गंभीर असल्याने, कोरोनाच्या पाश्वभूमीवर याबाबत.. कारवाई व्हावी, या हेतूने संबंधित पर्यंत घटनाक्रम सांगितले, आता कारवाई होणार पण, असे काही झाले नाही. पण उलट कुठेतरी माशी शिंकली, आणि जामखेड महामार्गावरील हाँटेल चालकांना थेट जाऊन ही माहिती मिडियापर्यंत गेली आहे, तुम्ही दोन-चार दिवस हाँटेल सुरू करु नका, असाच थेट बीटवाल्याने पोहचविताच, सर्व हाँटेल बंद असो. यामुळे एसपी साहेब जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात वास्तवात वेगळेच, म्हणून दिसते तसे नसते...। 
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि जिल्हा पोलीस दलातील प्रमुखांचे घनिष्ठ संबंध, हे सर्व समजून घेण्यासाठी एसपी साहेब यांना विश्वासू मावळे मिळले पाहिजे, पण तसे दिसत नाही. ही सर्व घेडामोड अखेर मंथन करायला लावणारी आहेत. 

Post a Comment

0 Comments