आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.५ - एका दाखल गुन्ह्यात हावे असणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात भिंगार कँम्प पोलिसांना यश आले आहे. गणेश गोरख साठे, विशाल शहाराम वारुळे, सचिन उर्फ लखन मंजाबापू (सर्व रा.वारुळवाडी) अशी पकडण्यात आलेल्या फरारी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिंगार कँम्प पोलिस ठाण्यात भादवी कलम 326,143,147 या कलमान्वये गणेश गोरख साठे, विशाल शहाराम वारुळे, सचिन उर्फ लखन मंजाबापू याच्यावर गुन्हा दाखल आहे. तिघेही आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. या तिघा फरार आरोपींची भिंगार कँम्प पोलिस ठाण्याचे सपोनि प्रविण पाटील यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार सपोनि प्रविण पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार तिघा आरोपींना सापळा लावून पकडण्यात आले. पोना राजेंद्र सुद्रीक, एचसी नगरे, भानुदास खेडकर यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.
0 Comments