Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोन्याच्या दागिने, मोबाईल चोरणारा आरोपी मुद्देमालसह जेरबंद ; एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१३- आष्टी तालुक्यातील मातकळी येथे सोन्याच्या दागिने व मोबाईल चोरणारा मुद्देमालासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस ताब्यात घेतले. अजित माणीक वरसे (वय३०,रा.मातकळी ता.आष्टी जि.बीड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलीसकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड बाजारपेठ आशिर्वाद कलेक्शन येथे मोबाईल, सोन्याची ५ ग्रँमची अंगठी व रोख रक्कम असा एकूण १८ हजार रु.चा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी प्रतीषा प्रशांत पवार यांनी (रा.सारोळा ता.जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना स्था.गु.शा.पो.नि.दिलीप पवार यांना सदर हा गुन्हा अजित माणीक वरसे (रा.मातकळी ता.आष्टी) याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि.पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीच्या पोलिसांनी मातकळी (ता.आष्टी जि.बीड) येथे जाऊन त्याला गावातून ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच अप्पो कंपनीचा मोबाईल व सोन्याची अंगठी काढून दिली. तो मुद्देमाल जप्त करुन आरोपीस पुढील तपासासाठी जामखेड पोलीसाच्या ताब्यात दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ विजयकुमार वेठेकर, पोना संदिप पवार, रविंद्र कर्डिले, दीपक शिंदे, संतोष लोढे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, चापोनी बी.डी.धुळे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments