Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारगावात तीन कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३०- नाही नाही म्हणता भिंगारगावात तीन कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.परिणामी छावणी परिषदेच्यावतीने तो गल्लीपरिसर सील करण्याचे काम युद्धपातळी सुरू करण्यात आले आहे.
सर्वत्र कोरोना रुग्ण सापडत असतांना भिंगार येथे अद्याप एकही कोरोना पाँझिटिव्ह नसल्याने भिंगारवासिय निश्चिंत होते.पण नगरला कोहिनूर वस्त्र दालनात रुग्ण आढळला.तेथील काही कर्मचारी भिंगारला राहतात.त्यांची तपासणी केली असता.ते तिघे पाँझिटिव्ह आढळले.त्यामुळे गावात खळबळ उडाली असून सर्वजण सावध झाले आहेत.
हे तिघे राहत असलेल्या व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोधकार्य आता हाती घेण्यात आले आहे.त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. याभागातील सर्व व्यवहार बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वीच लगतच्या वडारवाडी भागात तिघेजण तर काल पुन्हा एकजण कोरोना पाँझिटिव्ह आढळला आहे.तर सर्व प्रथम आलमगीर येथील दोघेजण कोरोना पाँझिटिव्ह सापडले होते.त्यानंतर काल पुन्हा एकजण सापडला आहे.
त्यामुळे नागरिकांनी फारच गरज असेल तरच तोंडाला मास्क लावून घराबाहेर पडावे.सोशलडिस्टंशन पाळावे असे आवाहन छावणी परिषदेने केले आहे.

Post a Comment

0 Comments