Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीतील खूनप्रकारणाचा १२ तासात तपास ; ३ आरोपी जेरबंद ; शिर्डी पोलीस व एलसीबीची कामगिरी

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
शिर्डी,दि.१४- येथील सार्वजनिक शौचालयातील खूनप्रकारणाचा १२ तासाच्या आत तपास लावून तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. शिर्डी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही महत्त्वाची कारवाई केली. राजेंद्र गोविंद गवळी (वय३०,रा.साठेनगर,ता.घनसावंगी,जि.जालन), सुनील महादेव कांबळे (वय २१, रा. मारुती मंदिरजवळ शिंगणापूर, ता.जत, जि.सांगली), सुनिल शिवाजी जाधव(वय३०, रा.यशवंतनगर, सोनारवाडा,ता.बार्शी जि. सोलापूर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी (दि.१३) सकाळी ८ वा. शिर्डी बसस्थानकसमोरील सार्वजनिक शौचालयात कोणीतरी अज्ञातांनी काहितरी कारणास्तव इसमाच्या डोक्यावर, हात,पायावर सिमेंटच्या ब्लॉक व हत्याराने जखमी करून हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारीसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वेगवेगळी पथके तपासासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, शिर्डी परिसरातील भिकारी यांना एकत्र करून त्याच्या कडून मयताची ओळख पटविण्याचे व आरोपींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पण मयताबाबत व आरोपींची कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत. यादरम्यान, श्वान पथक व बोटे ठसे तज्ञ्जाकडून बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली.यानंतर वरिष्ठीच्या आदेशानुसार एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी त्यांच्या पथकासह शिर्डी पोलीस यांनी तांत्रिक दष्टया व गोपनीय माहिती आधारे तपास करण्यात आला. तपासअंती मयत इसम समवेत असणाऱ्या इसमावरील संशयिवरुन त्या संबंधिताचा शिर्डी परिसरात व शिर्डी रेल्वे स्थानक परिसरात वेड्या बाभळीच्या जंगलात शोध घेतला. परंतु या ठिकाणी ते मिळून आले नाहीत. सदर संशयित इसमाबाबत राहाता पोलीस ठाणे, शिर्डी वाहतूक शाखा व शिर्डी रेल्वे सुरक्षा बल यांना माहिती देऊन संशयिताचा शोध सुरू केला. या आधारावरुन मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या शिताफीने एलसीबी पथक व शिर्डी पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन राजेंद्र गोविंद गवळी (वय ३०, रा. साठेनगर ता.घनसावंगी जि.जालना), सुनील महादेव कांबळे (वय २१, रा. मारुती मंदिरजवळ शिंगणापूर, ता.जत, जि.सांगली), सुनिल शिवाजी जाधव (वय ३०, रा.यशवंतनगर, सोनारवाडा, ता.बार्शी जि. सोलापूर) यांना सदर घटनेबाबतच्या पुढील तपासासाठी ताब्यात घेतले. त्याच्या कडे कसून चौकशी केली असता, त्यांनी मयत अनोळखी इसमाजवळील पैसे काढून घेण्याच्या उद्देशाने त्याला शौचालयात नेऊन सिमेंट पेव्हर ब्लॉक व स्टील राँडने मारुन हत्या केल्याची कबुली दिली. ही तिन्ही आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातून शिर्डी येथे आले होते. ते शिर्डी परिसरात मोलमजुरी करतात तसेच भिक मागून उदरनिर्वाह करत होते. 
तिन्ही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून, मयत ईसमाचे शंकर उर्फ आण्णा असे नाव निष्पन्न झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर जिल्हा पोलीस अधीक्षक दीपाली कांबळे- काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार व त्यांच्या पथकासह, शिर्डी पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक गंधाले, मिथुन घुगे, प्रविण दातरे, पोसई बारकू, पोनि गोकावे, भोये, राहाताचे पोसई आण्णासाहेब परदेशी, शिर्डी रेल्वे सुरक्षा दलाचे पो.नि.आर एल मिना आदिसह शिर्डी, राहाता व एलसीबीच्या पथकाने ही महत्त्वाची कामगिरी केली.

Post a Comment

0 Comments