Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अट्टल दरोडेखोर अटक ; कोतवाली पोलिसांची कारवाई

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१३- अंभोरा चेक पोस्ट येथे सापळा लावून दोन अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या डिबीला यश आले आहे. संतोष नंदू भोसले (वय १९), काळू निलगिर्या भोसले (वय ३०, दोघे रा.वाळूंज पारगाव ता.नगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चंदन इस्टेट मध्ये बंगाल्याच्या दराचे कुलूप तोडून चोरीप्रकरणी दाखल गुन्हातील आरोपी हे अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत येणार असल्याची माहिती कोतवालीचे पो.नि. प्रविण लोंखडे यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी अंभोरा चेक पोस्टवर सापळा लावून संतोष नंदू भोसले , काळू निलगिर्या भोसले या दोघांना मोठ्या शिताफीने पकडले. यावेळी पोलीस खाक्या दाखविताच, कोतवाली हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पो.नि.प्रविण लोंखडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार डिबीचे पोसई सतिश शिरसाठ, अंभोरा पोस्टचे प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे, कोतवालीचे पोना गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोकाँ सुजय हिवाळे, भारत इंगळे, बापू गोरे, गणेश चव्हाण, देवडे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments