Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रात जुलैत प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी; नियमावली तयार, मुख्यमंत्र्यांच्या सहमतीची प्रतीक्षा


महिनाभरात रुग्ण आढळला नाही तर तेथे ९वी, १०वी व १२वीचे वर्ग जुलैपासून तर ६ वी ते ८ वीचे वर्ग ऑगस्टपासून 
सुरू करण्याचे विचारधीन.
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई : देशात संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सावध भूमिका घेतली जात आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु शाळा केव्हा सुरु होणार याबाबत राज्यातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडला आहे. राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण विभागाची तयारी आहे. यासाठी शाळा कशा सुरू करता येतील यासाठी शिक्षण विभागाने नियमावली तयार केली आहे. या सर्व घडामोडींसाठी आता केवळ मुख्यमंत्र्यांची सहमतीची प्रतीक्षा आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल, याची खात्री करून शाळा सुरू होऊ शकणार. सरसकट शाळा सुरू होणार नाहीत. जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथल्या ९वी, १० वी आणि १२ वीचे वर्ग जुलैपासून सुरू होऊ शकतात. सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू होऊ शकतात. पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात. अकरावीचे वर्ग दहावीचे निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार. ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू होऊ शकतात.
हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना असतील. एक दिवसआड शाळा भरवण्याची मुभा असणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शाळेचे निर्जंकीकरण करावे लागणार आहे. विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांना मास्क घालाणे बंधनकारक असणार आहे.

Post a Comment

0 Comments