Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मिरजगाव येथे दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पो.स्टे यांची संयुक्त कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत दि.२५- तालुक्यातील मिरजगाव येथे दरोडा टाकून जीवे ठार मारण्याची धमकी देत, ३ लाखाचे दागिने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलीसांनी संयुक्त कारवाई केली आहे. युवराज उर्फ धोंडीवा ईश्वर भोसले, सोन्या ऊर्फ लाल्या ईश्वर भोसले, देविदास उर्फ देवड्या अभिमान काळे अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २३ जून रोजीचे रात्री फिर्यादी मधुकर विठ्ठल कोरडे (वय ३२ वर्ष रा . शिंगवी कॉलनी, कडा रोड , मिरजगाव ता . कर्जत) हे त्यांचे पत्नीसह घरामध्ये झोपलेले असतांना अनोळखी गुन्हेगारांनी फिर्यादीचे घराचे दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन घरामध्ये घुसून फिर्यादी व त्यांचे पत्नीला तलवारीचा धाक दाखवून व जिवे ठार मारण्याची धमकी देवून घरातील कपाटामध्ये असलेले ३ लाख ५०० रु . किमतीचे दागिणे चोरुन नेले . सदर घटने बाबत फिर्यादी यांनी कर्जत पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र. नंबर । ४५३/२०२० भा . द . वि.कलम ३९५, ३९७, ४५७, ३८० प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.  गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह , अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी , कर्जत विभागाचे संजय सातव , यांनी तसेच पो. नि.  दिलीप पवार स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी त्यांचे सोबतचे पथकासह ठिकाणी भेट देवून घडलेल्या घटनेची माहिती घेतली त्यांनतर  पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून दिलेल्या सुचना प्रमाणे सदर गुन्हयाचे तपासकामी 
कर्जत उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिलीप पवार यांची वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयाचा तपास सुरू करण्यात आला . सदर गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पोना सुनिल चव्हाण यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा युवराज उर्फ धोडर्डीराम ईश्वर भोसले याने व त्याचे साथीदारांनी मिळून केली असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपी राहत असलेल्या परिसरामध्ये सापळा लावून पाठलाग करीत आरोपी युवराज उर्फ धोडीराम ईश्वर भोसले (वय २३ वर्ष रा . बेलगाव ता.कर्जत जि.अ.नगर ), सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले (वय २५ वर्ष , रा . बेलगाव ता.कर्जत जि.अ.नगर), देवीदास उर्फ देवडया अभिमान काळे (वय २८ रा . हरीनारायण आष्टा, ता.आष्टी जि . बीड) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल व कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे साथीदारासह केले असल्याची कबुली दिली. त्यावरुन साथीदार आरोपींचा शोध घेण्यात आला परंतु ते मिळुन आले नाहीत. तिन्ही आरोपीना कर्जत पो.स्टे . गु.र. नंबर 1 ४५३/२०२० भा . द . वि.कलम ३ ९ ५ , ३ ९ ७ , ४५७ , ३८० या गुन्हयात अटक करण्यात आले. पुढील कारवाई कर्जत पो.स्टे . हे करीत आहेत . सदर बाबत कसुन चौकशी करण्यात येत आहे . वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 

युवराज उर्फ धोंडीवा ईश्वर भोसले (वय२३ , रा.बेलगाव ता.कर्जत जि.अ.नगर याच्यावर १) आष्टी पो.स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. १३२/२०१५ भा.द. वि . कलम ३९४, २ ) जत पो . स्टे . जिल्हा सांगली गु.र.नं. ११ ९ / २०१६ भा.द. वि . कलम ३९५,३९७३ ) कर्जत पो . स्टे गु.र.नं. T५४ / २०११ भा.द.वि. कलम ३ ९ ५,३ ९ ७ ४ ) सांगोला पो . स्टे . गु.र.नं. ११३७२ / २०१ ९ भा.द. वि . कलम ३ ९ ५ ५ ) सांगोला पो . स्टे गु.र.नं. ११११/२०१७ भा.द. वि . कलम ३ ९ ४,४५८,४५ ९, ६ ) अंभोरा पो . स्टे.जि.बीड गु.र.नं. १३/२०१८ भा.द. वि .कलम३७९, ७ ) पाथर्डी पो.स्टे . गु.र.नं. 1४ ९ / २०१८ भा.द. वि . कलम ३ ९ ६ ८ ) आष्टी पो . स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. 1४२/२०१४ भा.द. वि . कलम ३७६ ( ड ) , ३६३ ९ ) आष्टी पो . स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. पा १३२/२०१६ आर्म अॅक्ट कलम ४/२५ १० ) पाथर्डी पो.स्टे . गु.र.नं. ७४/२०१८ आर्म अॅक्ट कलम ४/२५ 

सोन्या ऊर्फ लाल्या ईश्वर भोसले , वय -२५ वर्षे , रा . बेलगाव ता . कर्जत जि.अ.नगर याच्यावर १ ) आमळनेर पो . स्टे . गु.र.नं. २५/२०१४ भा.द. वि . कलम ३ ९ ५ २ ) पाथर्डी पो.स्टे . गु.र.नं. 1 ४ ९ / २०१८ भा.द. वि . कलम ३ ९ ६ ३ ) आष्टी पो . स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. । १२६/२०१५ भा.द. वि . कलम ३ ९ ५ ४ ) कर्जत पो.स्टे . गु.र.नं. 1 १६४/२०१६ भा.द. वि . कलम ३०२,४०२ ५ ) आष्टी पो . स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. १ ९ ८ / २०१४ भा.द. वि . कलम ४५७,३८० ६ ) आष्टी पो . स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. ॥ १३२/२०१६ आर्म अॅक्ट कलम ४/२५ ७ ) आष्टी पो.स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. T६६ / २०१५ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४ ९ वगैरे ८ ) आष्टी पो . स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. T६० / २०१६ आर्म अॅक्ट कलम ४/२५ ९ ) जामखेड पो.स्टे . गु.र.नं. ३५/२०१६ भा.द. वि . कलम ४५८,४५ ९ १० ) नगर तालुका पो.स्टे . गु.र.नं. 1 ११६/२०२० भा.द. वि . कलम ३ ९ ५ ११ ) नगर तालुका पो.स्टे . गु.र.नं. T१३२ / २०२० भा.द.वि. कलम ३ ९९ ३ )

देविदास उर्फ देवड्या अभिमान काळे , वय -२८ वर्षे , रा . हरीनारायण आष्ठा ता . आष्टी जि.बीड १ ) आष्टी पो . स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. ११२६/२०१५ भा.द. वि . कलम ३ ९ ५ २ ) आष्टी पो . स्टे . जिल्हा बीड गु.र.नं. 1५६/२००३ भा.द. वि . कलम ३९४ आदि ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह , अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कर्जत उप विभागीय पोलीस संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिलीप पवार व त्यांचे पथकातील पोसई गणेश इंगळे , पोहेकॉ दत्ता हिंगडे , पोहेकॉ अंकुश ढवळे , पोना सुनिल चव्हाण, पोना आण्णा पवार , दिनेश मोरे , संतोष लोढे , रविंद्र घुगासे , रविद्र कर्डिले, संदिप पवार आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

Post a Comment

0 Comments