Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना शासनाने वस्तुरुपात तातडीने मदत करावी - राजेश परजणे


आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कोपरगांव दि. १७ :  कोपरगांव तालुक्यात सोमवारी दुपारी ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीसह अनेक घरांचे तसेच अन्नधान्याचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेवून नुकसानग्रस्तांना तातडीने वस्तुरुपात व रोख स्वरुपात शासकीय मदत करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी केली.
   मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना
पाठविलेल्या निवेदनात श्री परजणे यांनी पुढे नमूद केले आहे की, कोपरगांव तालुक्यात सर्वच ठिकाणी प्रामुख्याने पूर्व भागात सोमवारी दि.१५ जून रोजी दुपारी सुमारे तीन तासाहून अधिक वेळ अचानक ढगफुटीसदृष्य अतिवृष्टी झाली. तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, खोपडी, भोजडे, कान्हेगांव, तळेगांवमळे, ओगदी आदी गावातील शेतीला अक्षरश: तळ्याचे स्वरुप आले होते. काढणीस आलेली उन्हाळी पिके तसेच शेकडो हेक्टरवर नुकतीच पेरणी केलेली सर्व बियाणे पूर्णपणे वाहून गेली आहेत. आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकरी, शेतमजुरांची तसेच भूमीहीन लोकांची घरे जमीनदोस्त झाली असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातल्या जीवनावश्यक
वस्तुंसह अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झालेली आहे. अशा नुकसानग्रस्त कुटुंबापुढे उपजिविकेचा प्रश्न उभा राहिलेला आहे. एकतर आधीच कोरोनासारख्या महामारीमुळे शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत असताना त्यात अतिवृष्टीने जोरदार फटका दिल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
   अशा संकटात नुकसानग्रस्तांना आधार देण्याची गरज असून शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वस्तूरुपात आणि रोख स्वरूपात मदत करण्याबाबत जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय यंत्रणांना आपल्या सूचना व्हाव्यात, अशी विनंतीही ही श्री परजणे यांनी मंत्रीमहोदयांकडे केली.

Post a Comment

0 Comments