Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहरातील चेकपोस्टला अज्ञात वाहनाची धडक : शिक्षक जखमी


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
जामखेड : कोरोना पाश्र्वभूमीवर शहरातील कोठारी पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या चेकपोस्टवर नियुक्तीवर असणार्‍या कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपास रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बांबू व खुर्च्यांचे नुकसान झाले. तसेच नियुक्तीवर असणार्‍या शिक्षकाला देखील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक शिक्षक जखमी झाला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून चेकपोस्टवर सुविधांचा अभाव समोर आला आहे.

जामखेड तालुक्यात सहा चेकपोस्टवर कोरोना काळात पोलीसांना मदत म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. या शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस बारा तास नियुक्ती देण्यात आली आहे. तर काॅरन्टाईन केंद्रावर दररोज आठ तास नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र येथील चेकपोस्टवर सुविधांचा अभाव आहे. ज्या ठिकाणी बॅरिकेटर्स आहेत त्यावर रेडिअम लावणे आवश्यक आहे पण ते लावण्यात आलेले नाहीत.त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ते  दिसत नाही. तसेच चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे परंतु ते देखील बसवण्यात आले नाहीत. शहरातील दि.१६ रोजी कोठारी पेट्रोल पंपावर एका आयशर टॅम्पोने चेकपोस्टवर लावण्यात आलेले बॅरिकेटर्स उडविले तर लक्ष्मी चौकात रात्री आठ ते सकाळी आठ नियुक्तीवर असणारे शिक्षक उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे व होमगार्ड दगडे हे नियुक्तीवर होते. रात्री साडे अकराच्या दरम्यान एका अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिल्याने मंडपाचे बांबू तोडून मंडपातील तीन खुर्च्या मोडतोड झाली. खुर्चीवर बसलेले शिक्षक उदयकुमार दाहितोडे यांना धडक दिल्याने ते खाली पडले त्यांच्या डोक्याला पायाला व कमरेला चांगला मार लागला. मात्र घटनास्थळाहुन लगेच मोटारसायकलस्वार पसार झाला. नियुक्तीवर असणारे पोलीस कर्मचारी गैरहजर होते. तसेच चेकपोस्टवर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे बंदोबस्तावर आसलेल्या पोलिस व शिक्षकांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी शिक्षकांन कडुन होत आहे.

मंडपाशेजारी पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव असतो अशा ठिकाणी बारा तास शिक्षकांना थांबावे लागत आहे. तसेच ५५ वर्षांवरील शिक्षकांना व जे आजारी आहेत त्यांनाही नियुक्ती दिल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. काम करण्यास सर्व शिक्षक तयार आहेत पण बरोबर पोलीस हवेत तसेच चेकपोस्टवर सुविधांचा अभाव आहे. मंडपाच्या बांबूला रेडिअम लावणे गरजेचे आहे. व बारा तासाऐवजी आठ तास दिवटी द्यावी व बरोबर पोलीस हवेत आहेत.

Post a Comment

0 Comments