Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तालुक्यातील अनेक गावात नाही मोबाईलला रेंज;कशी भरणार ऑनलाइन शाळा ?


काही ठिकाणी स्मार्ट फोन नाही, स्मार्टफोन आहे तर रेंज नाही, ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागात डोकेदुखी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड दि.१५ : काेराेनाचे संकट जगावर काेसळल अन सार जग एका जागेवरच थांबल, सर्व क्षेत्रावर याचा परिणाम झाला. सहाजिकच शिक्षण क्षेत्राला याची माेठी झळ बसली. त्यात काेराेनाच्या सावटातून सावरता सावरता इतर क्षेत्राप्रमाणे शिक्षण क्षेत्रात नवीनवीन पद्धत अवलंबने गरजेचे असताना अाता अाॅनलाईन शिक्षणावर तालुक्याचे आमदार रोहित पवार व शिक्षण विभाग भर देत असून त्यादृष्टीने ग्रामीण भागात विभागाच्यावतीने सर्व्हे सुरु केला अाहे. शिक्षण क्षेत्रातील खाजगी शाळा- क्लासेस सुमारे ८० टक्के अाॅनलाईन झाले. त्यात अाता झेडपी शाळांनाही अाॅनलाईन शिक्षणाचे वेध लागले अाहे. ग्रामीण भागात केवळ ४० ते ५० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडेच स्मार्ट फाेन असून त्यातही तालुक्यातील शहरासह बहुतांश गावांमध्ये रेंज नसल्याने या अाॅनलाईन शिक्षणापासून ग्रामीण भागातील मुले पुन्हा वंचित राहण्याची भिती निर्माण झाली अाहे.
 काेराेनातून सावरत अाता नवीन जगात शहरीभागात माेठ्या प्रमाणावर अाॅनलाईन शिक्षण पद्धतीवर भर देण्यात अाला अाहे. त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातील मुलेही मागे रहायला नकाे या उद्दात हेतूने कर्जत-जामखेडमधील ४५८ शाळांचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी सोडवला. पवार यांच्या पुढाकारातून व झोहो कार्पोरेशनच्या माध्यमातून या दोन तालुक्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे २७ हजार विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण होणार आहे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेडमध्ये सुरू केलेल्या डिजीटल शाळांचे ऑनलाईन उदघाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले यामध्ये रोहित पवार यांनी झोहो कार्पोरेशनच्या मदतीने व्हर्च्युअल अभ्यासक्रमाचा पर्याय शोधला. या कर्जत-जामखेड तालुक्यातील ४५८ शाळांमधील पहिली ते सातवीपर्यंतचे २७ हजार विद्यार्थी शिकू शकतील अशी नवी संकल्पना त्यांनी शोधली. यामध्ये पालकांच्या मोबाईलची शाळेतील संबंधित वर्गाच्या शिक्षकांकडे नोंदणी करून त्या मुलाचा वर्ग सुरू होतील. शिक्षक त्या वर्गाचे म्हणजे ग्रुपचे अॅडमिन असतील आणि हे शिक्षक त्या वर्गातील मुलांना दररोज सकाळी अभ्यासक्रम पाठवतील. त्या अभ्यासक्रमानंतर दिलेला गृहपाठ दुसऱ्या दिवशी तपासतील. ठरलेल्या दिवशी त्याची परीक्षा देखील घेऊ शकतील अशा प्रकारची संकल्पना आहे.मात्र जामखेड तालुक्याचा विचार केला असता १७७ जिल्हा परिषद शाळा शाळांमधील १८००० विद्यार्थ्यां शिक्षण घेत आहे मात्र शहरसह तालुक्यातील अनेक गावात मोबाईलला रेंज नाही सध्याही अनेक गावात २ जी ३ जी सेवा मिळणेही मुश्किल आहे त्यातच कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागातील गोरगरीब पालकांना रोजगार उपलब्ध नसल्याने पालक आर्थिक अडचणीत आहेत. तीन महिन्यांपासून हाताला काम नाही आता मुलाच्या शिक्षणासाठी चार-पाच हजार रुपयाचा मोबाईल आणायचा कोठून ? शासनाने यासाठी काहीतरी उपाययोजना अगोदर करायला पाहिजे होती सर्वच पालकाकडे स्मार्टफोन नाहीत. ग्रामीण भागात वाडी-वस्तीवर मोबाईलला रेंज असेलच असे नाही. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्रॉइड
 अजूनही मोठी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. तर काही कुटुंब आजही अत्यंत गरीब राहतात त्यांना दोन खास वेळेवर मिळत नाही मग मोबाईल कुठून आणायचा ?मोबाईलला रिचार्ज कोण करणार?ग्रामीण भागात लाईटची मोठी समस्या आहे त्याचा काय ? काहींना तर फोनमधले एक बॅटनही कळत नाही. जे काय आहे ते मुलंच करतात आता ते पिक्चर बघताय का ऑनलाईन शिक्षण करताय हे त्यांना कस कळणार साहेब. ऑनलाईन शिक्षण म्हटल्यावर थोडा गोंधळ होणारच मात्र विध्यार्थ्यांना डिजिटलचे महत्व कळेल.-
 लक्ष्मणराव कानडे, सामाजिक कार्यकर्ते
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अडचणीतून मार्ग काढू- आ पवार
दोन्ही तालुक्यातील मुलांचे शिक्षण मागे राहू नये अशी मनोमन इच्छा होती. शिक्षणाच्या बाबतीत कधीही या दोन तालुक्यातील मुले मागे राहणार नाहीत व पायाभूत शिक्षणाबाबत नेहमी अग्रेसर राहतील याच दृष्टीने आजवर विचार केला आणि त्यातूनच झोहो वर्गाची निर्मिती झाली आहे, ही संकल्पना जर इतर लोकप्रतिनिधींना आवडली, राज्य शासनाला आवडली तर इतरही ठिकाणी ती सुरू होईल अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागात मोबाईल व नेटवर्कच्या अडचणी असतील, मात्र त्यातूनही मार्ग काढावा लागेल. येत्या काळात त्यावरही पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.Post a Comment

0 Comments