Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

जामखेड - अपघातामुळे झालेल्या हॉस्पिटल च्या बीलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून तेलंगशी या ठिकाणी एक जणावर कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी दोघाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर केरबा ढाळे (रा. तेलंगशी) याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तानाजी विठ्ठल पांडुळे व विठ्ठल खेमा पांडुळे (दोघे राहणार तेलंगशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २७ रोजी सकाळी तेलंगशी गावातील वेशीजवळ ढाळे हा दूध घालण्यासाठी तेलंगशी गावात आला होता, या दरम्यान ढाळे हा वेशीजवळ थांबलेला असताना त्यावेळी तानाजी विठ्ठल पांडुळे व विठ्ठल खेमा पांडुळे यांनी ढाळेच्याजवळ जावूून म्हणाले की, तू अहमदनगर येथील हॉस्पिटल मधील अपघातांमध्ये झालेल्या खर्चाची रक्कम का देत नाही, असे म्हणून तानाजी पांडुळे याने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने ढाळेच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली तसेच विठ्ठल पांडुळे याने तानाजीच्या हातातील कुर्‍हाड हिसकावून घेऊन त्याच कुर्‍हाडीने ढाळे यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून छातीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ढाळे हा स्वतःहा जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments