Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ट्रॅक्टरखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू, धनेगाव येथील घटना : शुक्रवारी दुपारी घडली घटना


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड दि.२६-जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टरखाली चिरडून दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेतील मृतांमध्ये चालकाचा समावेश आहे. शुभम दत्तात्रय लोहकरे व भगवान श्रीरंग उकीरडे अशी मृत तरुणांची नावे आहेत. 
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे शुक्रवार दि २६ रोजी दुपारी बाराच्या सुमारास जेटकेवाडी येथून ऊसाचे वाढे घेऊन एक ट्रॅक्टर धनेगावच्या दिशेने येत असताना धनेगाव परिसरातील कॅनाॅलच्या अवघड वळणाचा अंदाज न आल्याचे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर जागेवर पलटी झाला. या अपघातात शुभम दत्तात्रय लोहकरे (वय १४ ) व भगवान श्रीरंग उकीरडे वय २२ हे दोघे ट्रॅक्टरखाली चिरडून जागीच ठार झाले. या घटनेमुळे धनेगाव परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस हेड काँस्टेबल नवनाथ भिताडे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली. वैद्यकीय अधिकारी डाॅ युवराज खराडे यांनी जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात मृतांची उत्तरीय तपासणी केली व मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. जामखेड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेड काँस्टेबल नवनाथ भिताडे हे पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments