Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मतावळीत कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासनाने रस्ते खोदून वाटा बंद केल्या


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड दि.१०- जामखेड शहरापासून अवघ्या दहा की मी अंतरावरील मात्र काही दिवसांपूर्वीच मुंबई येथुन बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील मातावळीत एक रुग्ण मयत झाला आहे. याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला त्यामुळे जामखेड प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणून तात्काळ मातावळील जोडणारे रस्ता  जेसीबीच्या साह्याने खोदून बंद केले आहे.
 जामखेड शहरापासून अवघ्या दहा किमी अंतरावरील मात्र बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील मातावळीत या ठीकाणी रविवार दि ८ रोजी एक रुग्ण मयत झाला आहे. याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला आसुन हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच मुंबई येथुन मातावळीत आला होता.आष्टी तालुक्यातील मातावळी ही बीड जिल्ह्य़ात येत आसली तरी मातावळी आष्टी तालुक्यातील आजुबाजुला आसलेल्या गावातील अनेक नागरिक जामखेड कोरोनमुक्त झाल्याने बाजारपेठ सुरु करण्यात आल्याने खरेदी अथवा इतर कामासाठी येत आसतात त्यामुळे प्रशासनाने आता सतर्क तहसीलदार विशाल नाईकवाडे ,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप तलाठी सुखदेव कारंडे. शिवाजी हजारे यांनी जमदरवाडी जवळील हद्दीतील रास्ता जेसीबी मशीनने खोदून बंद केला आहे तसेच आष्टी वरूनही नगररोडनेही नागरिक मोठ्या प्रमाणावर नागरिक जामखेड शहरात येत आल्याने चेकपोस्ट कडक करण्याचे आदेश तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments