Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मातावळीत कोरोना पॉझिटिव्ह ; जामखेड कडे येणारे दोन रस्ते बंद


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड दि.९ : जामखेड पासूनच जवळच दहा की मी अंतरावरील मात्र बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील मातावळीत एका मयत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे चिंचपूर व जाबवाडी हे दोन रस्ते प्रशासनाने बंद केले असुन मातावळी हे गाव जामखेड पासून जवळ असल्याने जामखेडसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
जामखेड तालुक्यात दि २६ एप्रिल २०२० रोजी शेवटचा रुग्ण आढळून आला होता कोरोना काळात जामखेड शहरात एकुण १७ कोरोना रुग्ण आढळून आले होते. या नंतर तब्बल दिड महीन्यात एकही कोरोनाचा रुग्ण जामखेड शहरात सापडला नाही. ही नागरीकांच्या द्रुष्टीने दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. गेल्या पंधरा दिवसांपासून कुठे जामखेड ची बाजारपेठ सुरू झाली आहे. एकीकडे बाजारपेठ सुरू झाली आसली तरी दुसरीकडे जामखेड शहरापासून अवघ्या दहा की मी अंतरावरील मात्र बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील मातावळीत या ठीकाणी रविवार दि ८ रोजी एक रुग्ण मयत झाला आहे. याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला आसुन हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच मुंबई येथुन मातावळीत आला होता.
आष्टी तालुक्यातील मातावळी ही बीड जिल्ह्य़ात येत आसली तरी मातावळी सह आजुबाजुला आसलेल्या गावातील अनेक नागरिक जामखेड च्या बाजारपेठेत खरेदि अथवा इतर कामासाठी येत आसतात त्यामुळे प्रशासनाने आता सतर्क राहून चिंचपूर जवळील हद्द सील केली पाहिजे त्यामुळे जामखेड येथे बीड जिल्ह्य़ातील नागरीकांचा वावर रहाणार नाही. यासाठी शहरातील नागरिकांनी देखील सतर्क राहून आपली काळजी घेऊन कोरोनाला जामखेड तालुक्यात येण्यापासून रोखले पाहीजे अन्यथा पुन्हा जामखेडकरांना पुढील १४ दिवस हॉटस्पॉट मध्ये काढावे लागतील.गेल्या दिड महीन्यांपासून जामखेड शहरात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. मातावळी व आजुबाजुच्या गावातील लोक जामखेड शहरात येणार नाहीत यासाठी चिंचपूर व जांबवाडी हे दोन रस्ते सील करण्यात येणार आहेत. यासाठी तलाठी यांनी पहाणी करण्यासाठी पाठवले आहे. नागरीकांनी घाबरुन न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच गरज आसेल तरच घराबाहेर पडावे.
( विशाल नाईकवाडे)


Post a Comment

0 Comments