Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संगमनेरात २ कोरोनाबधित महिलांचा मृत्यू ; नगरला 23 वर्षे युवकाला कोरोनाची बाधा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.९- कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या संगमनेर येथील ६३ आणि ६५ वर्षीय महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दोन्ही महिलांना अती उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यापासून व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. संगमनेर शहरातील असलेल्या या महिला दि. ६ जून रोजी बाधित आढळून आल्या होत्या. 
नगर जिल्ह्यात आणखी तीन व्यक्ती कोरोना बाधित. संगमनेर शहरातील मोमीनपुरा येथील तीस वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव.
मुंबईहून संगमनेर येथे आलेला 18 वर्षीय युवक कोरोना बाधित.नगर शहरातील पांचपीर चावडी माळीवाडा येथील 23 वर्षे युवकाला कोरोनाची बाधा.

Post a Comment

0 Comments