Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जामखेडच्या पोकळे वस्तीवर पहाटे धाडसी दरोडा ; दोन लाख रोख व 22 तोळे सोने असा ऐवज दरोडेखोरांनी लंपास


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड दि.२४-   जामखेड शहरातील नगररोडवर असलेल्या पोकळेवस्तीवरील तात्याराम पोकळे यांच्या घरावर  पहाटेच्या अडीच्या सुमारास दरोडा पडला. या घटनेत रोख दोन लाख रुपये व 22 तोळे सोने असा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी भेट दिली.
    मंगळवारी पहाटे एक ते तीन वाजेच्या सुमारास ही चोरी झाली असावी असा अंदाज आहे. दरोडेखोरांनी तात्याराम पोकळे यांच्या घराच्या पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले. सर्व झोपेत असतानाच ही चोरी झाली.  तात्याराम पोकळे यांच्या आई पहाटे ऊठल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर ही चोरी लक्षात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी तातडीने भेट देत तपास सुरू केला. घटनास्थळी फींगरप्रींट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश माने,अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. दरम्यान घटनास्थळी श्वान पथक व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले आहे. जामखेड पोलिस वगाने तपास करत आहेत.
Post a Comment

0 Comments