Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने 1549 हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.9 - अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळमुळे झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 1549.46 हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील अहवाल आज जाहीर केला.
   शेतपिकाचे नुकसान झालेल्या मध्ये  अकोले 82.30 हेक्टर,, संगमनेर 1070.37, राहुरी 45.99, नगर 2.38, कोपरगाव- 1.70 हेक्टर, नेवासा 4.84, पारनेर 292.30, पाथर्डी 12.50, श्रीगोंदा 7.40 आणि श्रीरामपूर 29.68 हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले.                         याशिवाय, नगर आणि संगमनेर तालुक्यात प्रत्येकी एक आणि शेवगावमध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्याच्या घटना घडल्या तर अकोले तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला. याशिवाय, काही ठिकाणी जनावरे दगावण्याच्या घटनाही घडल्या. यांत अकोले 4, संगमनेर 7, कोपरगाव 1, श्रीरामपूर 2, नेवासा 1, राहाता 6, पारनेर 5, अशी 26 जनावरे मृत्युमुखी पडली.
 जिल्ह्यातील 32 कच्च्या प्रकारच्या घरांचे नुकसान झाले. यात, संगमनेरमध्ये सर्वाधीक 10 घरांचे नुकसान झाले.  तसेच, अकोले 1, कर्जत 1, कोपरगाव 10, नेवासा 2 आणि राहुरी 8 असे कच्च्या घरांचे नुकसान झाले. तर अंशतः कच्ची  असलेल्या 749 घरांचे नुकसान झालेले आहे. यांत नगर 8, अकोले 61, कर्जत 3, कोपरगाव 21, नेवासा-8, पारनेर 44, पाथर्डी 10, राहुरी 17, संगमनेर 531, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 18 आणि राहाता 15 असे नुकसान झाले. जिल्ह्याच्या विविध भागातील 8 झोपड्यांचेही नुकसान झाले. याशिवाय, 100 टक्के पक्की घरे असलेल्यांमध्ये राहुरी आणि संगमनेर येथील प्रत्येकी 2 घरांचे तर अंशता पक्की असलेल्या घरांमध्ये अकोले 8, कोपरगाव 3, नेवासा 2, राहुरी 5, संगमनेर 4 आणि शेवगाव 1 असे एकूण 23 घरांचे नुकसान झाले.         
Post a Comment

0 Comments