Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

२०२५ पर्यंत नाशिक विभाग हिवताप मुक्त होणार : डॉ. पी. डी गांडाळ


२०१० मध्ये १०,७२१ तर २०१९
 मध्ये हिवतापाचे फक्त ४६ रुग्ण आढळले
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१३ - भारतात मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय योजना योग्य पद्धतीने केल्याने मलेरिया हा आजार भारतातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना च्या पार्शवभूमीवर भारतातील मलेरिया प्रतिबंधक औषधांची मागणी देखील वाढत आहे.२०१० मध्ये मलेरियाचे १०,७२१ रुग्ण आढळले होते तर २०१९ मध्ये केवळ ४६ रुग्ण सापडल्याने मलेरिया वरील प्रतिबंधात्मक उपाय योजना किती प्रभावी पाने राबविली गेली हे दिसुन येते  अशी माहिती नाशिक विभागाचे हिवताप सहाय्यक संचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक विभागात नाशिक , अहमदनगर , जळगाव , नंदुरबार व धुळे अश्या  एकूण ५ जिल्ह्यांचा समावेश असून ४३१ ठिकाणी मलेरिया चिकित्सालये व उपचार केंद्रे स्थापन केलेली आहेत. त्यामुळे  या विभागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या सातत्याने घटतांना दिसत आहे. नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता आणि कार्यतत्पर आरोग्यसेवा यांचा हा सकारात्मक परिणाम आहे त्यामुळे सन  २०२० मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.
किटकजन्य  आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक येथे सहाय्यक संचालक ( हिवताप )  हे विभागीय कार्यालय आहे. किटकजन्य आजारात मलेरिया , डेंग्यू , चिकुनगुनिया आणि हत्तीरोग या सारख्या आजारांचा समावेश होतो एकेकाळी मलेरिया च्या साथीने सर्वत्र थैमान घातले होते यात अनेकांचे बाली सुद्धा गेले , मात्र मलेरिया या आजारावर वेळीच औषधोपचार घेतल्यास हमखास नियंत्रण मिळवता येते. या आजाराचे रुग्ण व मृत्यू चे प्रमाण संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन विशेष काळजी घेते नाशिक विभागातील ५४ तालुक्यांमध्ये हा आजार होऊच नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रसिद्धी व जनजागृती मोहीमा सातत्याने राबविल्या जातात . गेल्या १२ वर्षाच्या कालावधीत मलेरियाच्या रुग्ण संख्येत कमालीची घट  दिसून अली आहे एकही व्यक्तीचा मलेरियाची मृत्यू झालेला नाही २००८ - २०१९ मध्ये हिवताप रुग्णांचे वर्ष निहाय घटते प्रमाण दिसून आले असून २०२० मध्ये ते प्रमाण अगदी नगण्य आहे. गेल्या वर्षी मलेरियाच्या रुग्णांची संख्या ४६ असून नाशिक , अहमदनगर , जळगाव ह्या ३ जिल्ह्यात संख्या अत्यल्प आहे तर नंदुरबार व धुळे ह्या दोन जिल्ह्यात मलेरिया चे रुग्ण आढळत आहेत तेहि गुजरात व मध्य प्रदेश सीमेवरील चरितार्थासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये मलेरियाचे प्रमाण जास्त आहे. प्रशासनाच्या वतीने जनजागृतीतुन करण्यात येणाऱ्या आवाहनाला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो . हा आजार प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात होण्याची दाट  शक्यता असते ह्या कालावधीत मलेरिया सह इतर किटक जन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यात येतात व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिन पाळण्यात येतो.
रात्री झोपताना अंगभर कपडे घालावेत सायंकाळ्च्या वेळी दारे खिडक्या बंद ठेवणे डास घरात शिरण्यापासून मज्जाव करण्याच्या उपाय योजना करणे जोखीम ग्रस्त भागात किटक  नाशक औषधांची फवारणी करून घेणे भंगार साहित्य जसे फुटके डब्बे ,निकामी टायर्स   यांची वेळीच विल्हेवाट लावणे . व्हेन्ट पाईपला वरच्या बाजूला जाळी बांधणे अश्या उपाय योजनांची हिवताप व हत्तीरोग आजारांचे उच्चाटण  करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने जनजागृती केली जाते. त्याचा परिणाम म्हणून २००८ साली ६२४४ , २००९ साली ८२३९ , २०१० मध्ये  १०७२१ , २००१ मध्ये ८३०१ ,२०१२ मध्ये ५३३२ , २०१३ मध्ये २७६६ , २०१४ साली १८७५ , २०१५ मध्ये १३५२ , २०१६ साली ६१९, २०१७ मध्ये ३१२ , १२०१८ मध्ये ९४ आणि २०१९ मध्ये ४६ इतकी रुग्ण संख्येत घट झाली आहे.
सन  २०१९ मध्ये नाशिक विभागात २ कोटी १२ लाख १५ हजार ८६  लोकसंख्येत तापाच्या रुग्णांचे एकूण २६ लाख ९५ हजार ९५५ रक्त नमुने संकलित करून तपासणीत फेकते ४६ रुग्ण आढळले होते या वर्षी एप्रिल अखेर विभागात एकूण ७ लाख ११ हजार ६७ रक्त नमुने तपासण्यात आले त्यामध्ये हिवतापाचे ८ रुग्ण आढळले. ताप रुग्णाचे आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित रक्त नमुने घेऊन तपासणी अंती रुग्णांवर मोफत उपचार केले जातात त्यामुळे नाशिक विभागातील रुग्णांची संख्या झपाट्याने घटतांना दिसून येते . त्यामुळे  गेल्या  ५ वर्षात नाशिक विभागात प्रभावी पणे  जनजागृती केल्याने व नियमित पर्यवेक्षणाखाली उपचार होत असल्याने नाशिक विभागाचे उप संचालक डॉ. एम. आर पट्टणशेट्टी  यांच्या मार्गदर्शनाखाली  विभागातील हिवताप रुग्णांची संख्या घटली आहे  ह्यामुळे सन  २०२५ पर्यंत नाशिक विभाग मलेरिया मुक्त होईल असा विश्वास विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. गांडाळ  यांनी व्यक्त केला आहे. 

Post a Comment

0 Comments