Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; छाप्यात तरुण-तरुणीं ताब्यात

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
लुधियाना : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असताना, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावेत, असे आवाहन केले होते. या दरम्यान, पंजाबच्या कपूरथला या ठिकाणी पोलिसांनी एका गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या छाप्यात गेस्ट हाऊसमधून तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पंजाबमधील कपूरथला पोलिसांनी शुक्रवारी लॉकडाऊनच्या काळात नन्हा कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका गेस्ट हाऊसवर छापा टाकला. यावेळी तेथे दोन तरुणी, एक तरुण आणि गेस्ट हाऊसच्या मालकाला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा शटर बंद होतं पण आत सेक्स रॅकेट सुरू होतं.
पोलिसांनी शटर उघडून आत प्रवेश केला तेव्हा गेस्ट हाऊसचा मालकही तिथंच होता. गेस्ट हाऊसमधील रूम चेक करताना एका खोलीत दोन तरुणी आणि एक तरुण सापडला. पोलिसांना पाहताच त्यांनी कपडे घातले. त्यानंतर पोलिसांनी इतर खोल्यांमध्येही झडती घेतली.
छापा टाकलेल्या ठिकाणचे जुने सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी तपासले. त्यातही संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ठाण्यात आणलं. या कॉम्प्लेक्सचा आणखी एक मालक दिल्लीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या या अवैध गेस्ट हाऊसची याआधीही तक्रार आली होती. आज छापा टाकताच तिथं रंगेहात काही जणांना पकडण्यात आलं. यामध्ये दोन तरुणी, एक तरुण आणि गेस्ट हाऊसचा मालक यांचा समावेश आहे. 

Post a Comment

0 Comments