Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विळद घाट मधील डॉ. विखे पाटील हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणू तपासणीस मान्यता


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : दि.९ अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील साहेब यांच्या प्रत्ननातून डॉ. विखे पाटील मेमोरियल रुग्णालय व क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विषाणू (Covid-१९) नमुना संकलन केंद्र डॉ. विखे पाटील मेमोरियल रुग्णालय सुरु करण्यात आले.
आतापर्यंत ८ संशयिताचे स्वाब टेस्ट (घशातील नमुने) घेतले असून हे नमुने क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रा. लि. पुणे, येथे चाचणीसाठी पाठवले जातात. क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रयोगशाळेकडून पाठवले संबंधित ८ नमुने निगेटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत अशी माहिती डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मेडिकल विभागाचे उपसंचालक डॉ. अभिजित दिवटे यांनी दिली. 
देशात कोरोना व्हायरस अत्यंत वेगाने फेलाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा जीवघेण्या विषाणूशी लढण्यासाठी केंद्र व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपापयोजना युद्ध पातळीवर अहोरात्र प्रयत्न करून राबवित आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती पाहता नागरिकांचे स्वाब नमुने घेण्यास आणि कोरोनाग्रस्थ रुग्णांवर उपचार वेळेवर व्हावे म्हणून खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून डॉ. विखे पाटील मेमोरियल रुग्णालय स्थित क्रस्ना डायग्नॉस्टिक्स मध्ये कोविड-१९ चे नमुना संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली असून क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रा. लि. पुणे, हि लॅब आयसीएमआर आणि एनएबीएल मान्यताप्राप्त असून या प्रयोगशाळेला कोविड-१९ चाचणीची परवानगी सरकारने दिलेली आहे. नगर वासियांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या संचालिका पल्लवी जैन यांनी सांगितले.
परराज्यातील आणि महाराष्ट्रांतर्गत जिल्ह्यातील अडकलेले प्रवाशी घरी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली असता या प्रवासादरम्यान हॉस्टस्पॉट झोनमधील किंवा पॉसिटीव्ह रुग्णानाच्या संपर्कात आलेले कोरोना विषाणूची पार्श्वभूमी नसणाऱ्या व्यक्तीला कोरोनासदृश लक्षणे वाटत असतील तर चाचणी कोठे करावी असा प्रश्न नगरवासियांना सतत पडत होता त्यासाठी डॉ. विखे पाटील मेमोरियल रुग्णालय आणि क्रस्ना डायग्नॉस्टिक्स संस्थेच्या वतीने स्वाब नमुना घेण्यासाठी प्रतिनिधी घरी बोलावून या सुविधेचा लाभ घेऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी ७४२९९१४२०८/२५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना केले.

Post a Comment

0 Comments