Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पारनेर तालुक्यात गावठी दारु भट्ट्या उध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त ; एलसीबीची कारवाई


आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.७ - पारनेर तालुक्यातील खारवाडी, ढवळपुरी येथे असणाऱ्या गावठी दारुच्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या असून १ लाख १७ हजार रु.मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. महेंद्र भाऊसाहेब गव्हाणे (वय २१, खारवाडी, ढवळपुरी ता.पारनेर), सोपान हरिभाऊ पवार (वय ३०, रा.साकत, ता.नगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
खारवाडी, ढवळपुरी (ता.पारनेर) येथे काही लोक गावठी हातभट्टी दारु तयार केली जाते. ती दारु आजुबाजुच्या परिसरात चोरून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचासमक्ष ढवळपुरी येथे जाऊन खारवाडी शिवारात वाड्याच्या बाजूला दोघेजण भट्टी लावून गावठी दारू तयार करीत असताना सकाळी ७ वा. आढळून आले. यावेळी पोलिसांनी महेंद्र भाऊसाहेब गव्हाणे (वय २१, खारवाडी, ढवळपुरी ता.पारनेर), सोपान हरिभाऊ पवार (वय ३०, रा.साकत, ता.नगर) यांना पकडले. घटनास्थळी पंचासमक्ष झडती घेतली असता, १ लाख रु.किंमतीचे गावठी हातभट्टी दारु बनविण्यासाठीचे २ हजार लि.रसायन, प्रत्येकी २०० लि.१० लोंखडी बाँलर, १० हजार रु.चे २०० लि. जळके रसायन, २ लोंखडी बाँलर, ७ हजार रु.७० लि. तयार दारु दोन प्लास्टिक ट्रम, २ पांढरे धातूचे घमेले व चाटू असा १ लाख १७ हजार रु.मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकाँ बबन मखरे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, पोना आण्णा पवार, रविंद्र कर्डिले, राहुल सोळुंके, विनोद मासाळकर, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments