Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी परिसरातील दहा जणांना तपासणीनंतर केले इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन


कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी, दि.6-शिर्डी शहर परिसरातील नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक बारामध्ये मधील कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दहा व्यक्तिंना अहमदनगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीनंतर संबधितांना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ गोकुळ घोगरे, शिर्डी पोलीस, नगरपंचायतचे कर्मचारी, वैद्यकीय पथकाने या परिसरास तातडीने भेट देऊन आवश्यक उपाययोजना केल्या. बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नये, जर कोणी बाहेरील व्यक्ती आली तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनास देण्यात यावी. या भागातील रहिवाशांनी तसेच शिर्डी शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता घरीच थांबावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हाच उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सूचित केले. 
साथ रोग प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीनुसार प्रशासनाने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी विनाकारण गदी करु नये तसेच सोशल मिडीयातून अफवा पसरवू नये. प्रशासनातील सर्व यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments