Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रामपूरला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनुराग शर्मा यांचा खून


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
रामपूर, दि.२१ : उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर या ठिकाणाचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनुराग शर्मा यांची अज्ञातांनी गोळ्या घालून निर्घृण खून केल्याची घटना सिव्हिल लाइन परिसरातील आगापूर भागात घडली. अज्ञात मारेकरी घटनेनंतर पसार झाले आहेत.खुलेआम मारेकऱ्यांनी अनुराग शर्मा यांच्यावर गोळीबार केला. शर्मा यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, त्याआधीच ते मयत झाले. या घटनेनंतर अनुराग शर्मा यांच्या समर्थकांनी जिल्हा रुग्णालयात तोडफोड केली. परिस्थिती गंभीर झाल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अनुराग शर्मा यांची पत्नी शालिनी शर्मा या भाजपच्या नगरसेविका आहेत. घटनेनंतर भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस महासंचालक रमित शर्मा रामपूर येथे पोहोचले आहेत. रमित शर्मा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी अनुराग शर्मा यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

Post a Comment

0 Comments