Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.अर्थ पशुसंवर्धन समितीची व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे सभा ; विविध योजनांचा निधी तात्काळ देण्याच्या सभापती गडाख यांच्या सूचना


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.६- जिल्हा परिषदेच्या अर्थ पशुसंवर्धन समितीची सभापती सुनिल गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आँनलाईन व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे दि.६ रोजी सभा पार पडली. सभेत विविध योजनांचा निधी तात्काळ देण्याच्या सूचनासह सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचनांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना सभापती गडाख यांनी सूचना दिल्या.
यावेळी समिती सदस्या संध्याताई आठरे, सोनलीताई रोहमारे, शांताबाई खैरे, वंदनाताई लोंखडे, सदस्य दिनेश बर्डे, रावसाहेब कांगुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सुनील तुंबारे आदि सहभागी झाले होते.
आँनलाईन व्हिडीओ काँन्फरन्समध्ये पावसाळ्यापूर्वी जनावरांचे घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार प्रतिबंधक लसीकरण मे महिन्यापूर्वी करावी, अतिवृष्टी भाग व पुरग्रस्त भागात ही प्राधान्याने पूर्ण कारावे, यासाठी पथके स्थापन करण्यात यावेत, तसेच १३१ गावासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना ७८.६० लाख रु, विघयोतून -दुभत्या जनावरांचे गट वाटप १००.९९ लाख रु, शेळ्या, मेंढ्याचे गट वाटप ४४.८८ लाख रु., पशुखाद्य वाटप ९.९० लाख रु, आदिवासी उपयोजना - तलगा गट वाटपासाठी ४० लाख रु., पशुखाद्य वाटपसाठी २.५० लाख रु., शेळी गट वाटपासाठी ४७.५५ लाख रु., गाय वाटपासाठी ६.३८ लाख रु., आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजना (ओटीएसपी) तलंगा वाटपसाठी १० लाख रु., पशुखाद्य वाटपसाठी ,९.९९ लाख रु., शेळी वाटपसाठी ४.८१ लाख रु., जनावरांच्या गट वाटपसाठी ६.३८ लाख रु. असे एकूण ४०१.४८ लाख रु. या निधीचे तात्काळ लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तत्पूर्वी सदस्यांनी वैरण विकास योजनेतंर्गत आफ्रिकन टाँल जातीचे मका बियाणे पुरविण्यात यावेत, तसेच मुरघास बँगचा जिल्हा परिषदेने पुरवठा करावा.सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात खनिज मिश्रणाचा व दुध काढणी यंत्राचा पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments