Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.भालगाव गटात गावनिहाय टेस्टिंग आणि ट्रेसिंग प्रशासनाने अधिक वेगाने करावी ; जि.प.सदस्या प्रभावती ढाकणे

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.५ - भालगाव (ता.पाथर्डी) जिल्हा परिषद गटात गावनिहाय कोरोनाच्या पाश्वभूमीवर टेस्टिंग आणि ट्रेसिंग प्रशासनाने अधिक वेगाने  करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रभावती ढाकणे यांनी केली आहे.
पाथर्डी तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद गट हा अतिशय दुर्गम भागात आहे. या ठिकाणाचे नागरिक उदरनिर्वाहसाठी महाराष्ट्रात असणाऱ्या साखर कारखाना ठिकाणी ऊसतोडणीसाठी जातात. परंतु सध्या देशासह राज्यात लाँकडाऊन सुरू असल्याने तालुक्यातील भालगाव जि.प.गटातील ऊसतोडणी कामगार आपापल्या घरी परतले आहेत. यात अपवाद लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. यामुळे आलेल्या ऊसतोडणी कामगारांची कोरोनाच्या भयावह आजारापासून संरक्षण व्हावे, अथवा होऊ नये. यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून जि.प. भालगाव गटातील गावनिहाय टेस्टिंग व ट्रेसिंग वेगानं करावे, असे सौ. ढाकणे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments