Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारतात कोरोनाच्या वाढत्या आकड्यांने वाढवली चिंता ; महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची १४ हजार ५४१ संख्या


भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ४३३ ; गेल्या २४ तासांत आतापर्यंत सर्वात जास्त मृतांची नोंद 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
दिल्ली, दि.५ : देशात कोरोनोचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १७ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असला तरी, रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या २४ तासात आतापर्यंत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. मृतांचा आकडाही वाढला आहे. गेल्या २४ तासांत ३९०० नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे असून, १९५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४६ हजार ४33 झाली आहे.
गेल्या २४ तासांत आतापर्यंत सर्वात जास्त मृतांची नोंद झाली आहे. याआधी २४ तासांत ८३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र आता तब्बल १९५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह देशातील मृतांचा आकडा १५६८ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृत्यूदरात वाढ झालेली दिसून येत आहे.
आतापर्यंत १२ हजार ७२७ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहे. भारतातील निरोगी रुग्णांची टक्केवारी ही २७.४० आहे. याआधी हा आकडा जास्त होता. दरम्यान ४ मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यात तीन झोनमध्ये देशातील जिल्ह्यांची विभागणी करून काही प्रमाणात सूट देण्यात आल्या आहेत. मात्र अशा उपाययोजना करूनही देशातील रुग्णांची संख्या काही कमी होत नाही आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात सोमवारी नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आय सी एम आर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात सोमवारी ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments