Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांचा छापा ; ७१ हजार रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल ताब्यात


  
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - रेल्वे स्टेशन परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता, ८ जण मिळून आली. यावेळी ७ मोबाईल, पत्ते, रोख रक्कमेसह ७१ हजार ७६० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे काँलनी संरक्षण भिंतीच्या आडोश्याला एकत्र येऊन पैसावर तिरट नावाचा हरजितीचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास वाघ यांना मिळाली. तात्काळ पो.नि.वाघ यांनी त्यांच्या पथकाला पाठवून रविवारी दि.३ रोजी दुपारी ३.४५ वा. घटनास्थळी छापा टाकला. छाप्या दरम्यान, राहुल अशोक कचरे (वय २७, रा.रेल्वे स्टेशन काँटर,अहमदनगर), शशिकांत अनिल शिंदे (वय ३२, रा.रेल्वे स्टेशन काँटर,अहमदनगर),महेश दिलीप जाधव (वय ३०,रा.रेल्वे स्टेशन काँटर,अहमदनगर), प्रभुल दिपक अंभोरे (वय ३०, रा.रेल्वे स्टेशन काँटर,अहमदनगर), प्रविण संजय कांबळे (वय ३२, रा.रेल्वे स्टेशन काँटर,अहमदनगर), गणेश रविंद्र साळुंखे (वय ३२, रा.रेल्वे स्टेशन काँटर,अहमदनगर), राहुल शांताराम गायकवाड (वय ३४, रा.रेल्वे स्टेशन काँटर,अहमदनगर) आदिजण जुगार खेळताना मिळून आली. यावेळी ७ मोबाईल, पत्ते, रोख रक्कमेसह ७१ हजार ७६० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि विकास वाघ, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोसई कणसे, पोना गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोकाँ सुजय हिवाळे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments