Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राहाता पंचायत समितीत कुटुंब नियोजन केलेल्या दाम्पत्यास प्रोत्साहन अनुदान वाटप

  

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी : राहाता पंचायत समिती येथे महिला व बालकल्याण विभाग योजनेअंतर्गत कुटुंब नियोजन केलेल्या दाम्पत्यास प्रोत्साहन अनुदान वाटप कार्यक्रम नुकताच करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद कृषी विभाग व जि.प सेस फंड अंतर्गत आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबायांना मदतीचा धनादेशव,राजीव गांधी सानुग्रह योजने अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले, एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत कमी वजनाच्या बालकांचा व सर्वसामान्य बालकांचा आहाराच्या माहिती पत्रकाचे वितरण जि प माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्याहस्ते, करण्यात आले. जि प सद्स्य राजेश परजणे पाटील, सभापती नंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, जि प सद्स्य दिनेश बर्डे,रोहिणी निघूते, शाम माळी, पुष्पां रोहम,कविता लहारे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आदीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. राहता पंचायत समिती येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोक डाऊन चे नियमही पाळण्यात आले होते.सर्वांनी आपल्या तोंडाला मास्क लावलेले होते. तसेच सामाजिक दुरी ठेवून कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी मोजक्या स्वरूपातच व्यक्तींना याठिकाणी कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. लॉक डाऊनच्या काळात हे धनादेश मिळाल्यामुळे लाभार्थीकडून मोठे समाधान व्यक्त होत होते.


Post a Comment

0 Comments