Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपातर्फे मराठवाड्यातून विधान परिषदेची उमेदवारी नेत्या पंकजाताई मुंडे यांना द्यावी ; वंजारी ओबीसी विकास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ढाकणे यांची मागणी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.३
येत्या विधानपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीत मराठवाड्यामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने धडाडीच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वंजारी ओबीसी विकास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ढाकणे यांच्यासह महासंघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. तसे राज्यातील भाजप नेत्यांनी न केल्यास यापुढील काळात महासंघ भाजपाबरोबर कदापि राहणार नाही, असा इशाराही ढाकणे यांनी दिला आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी. तसे झाल्यास राज्यातील भाजपात पुन्हा नवचैतन्य येईल. यापूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात मोठ्या मेहनतीने तळागाळात पोहचविलेला भाजप पक्ष केवळ पक्षातील हावेदाव्यामुळे आणि अंतर्गत राजकीय कुरघोडीमुळे कमकुवत झाला आहे. आत पक्षाला पुन्हा नव्याने पुर्नजिवित करण्यासाठी विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीत राज्याच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी द्यावी, आणि एकप्रकारे भाजपाची ताकद राज्यात दुगणी करावी. भाजपाच्या नेत्यांनी नेत्या मुंडे यांना डावल्यास यापुढील काळात वंजारी ओबीसी विकास महासंघ भाजपाबरोबर राहणार नाही. परंतु नेत्या पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची मराठवाड्यातून उमेदवारी देऊन निवडून आणल्यास, वंजारी ओबीसी विकास महासंघाचे सर्वच पदाधिकारी भाजपाबरोबर राहू, असे ढाकणे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments