Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर पोलीसांच्या कार्याचा देशाला अभिमान : ब्रिगेडीअर विजय राणा

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : कोराना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, अहमदनगर जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलीस दल दिवस - रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत असल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन बिग्रेडीअर विजय राणा यांनी केले.
भारतीय सैन्य दलाचे अहमदनगर येथील बिग्रेडीअर विजय राणा व कर्नल ओ.पी.शर्मा यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा पोलीस दल कोराना विषाणु (कोव्हीड 19) चा प्रार्दुभाव रोखण्याकरीता करत असलेले कार्याचा पोलीस अधिक्षक कार्यालय अहमदनगर येथे बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक गृह प्रांजली सोनवणे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बिग्रेडीअर विजय राणा व कर्नल ओ.पी.शर्मा यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस दल कोराना विषाणु (कोव्हीड 19) चा प्रार्दुभाव रोखण्याकरीता करत असलेले कामाचे स्वरुप, त्यामध्ये सर्व बंदोबस्ताकरीता पोलीस अधिकारी व कर्मचारी वॉकीटॉकीव्दारे एकमेकांशी व पोलीस नियंत्रण कक्ष अहमदनगर कामाचे अनुशंगाने साधत असलेले समन्वय कामकाज, जिल्हयातील 21 नाकाबंदी चेक पोस्ट कामकाज, अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे सामाजिक जबाबदारीच्या बांधलकीतुन केलेले अन्न धान्य,जेवण व अत्यावश्यक साहित्य वाटप कामकाज, सायबर पोलीस स्टेशनचे सोशल मिडीयावर ठेवण्यात येणारे नियंत्रण, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता देण्यात आलेले संरक्षणात्मक साहित्य, जिल्हयातील हॉटस्पॉट व इतर ठिकाणी ड्रोन कॅमेराव्दारे नजर ठेवुन करण्यात आलेली कार्यवाही इत्यादी बाबीची प्रत्यक्ष माहिती घेवुन त्याबाबत केलेले कामकाज जाणुन घेतले.
ब्रिगेडीअर विजय राणा यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस दल " कोराना विषाणु " संसर्गजन्य आजार नियंत्रणासाठी करत असलेल्या सक्रिय (Proactive) कामाबाबत अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे कौतुक करुन सदर कामाबाबत देशाला आपला अभिमान वाटत आहे अशा भावना व्यक्त करुन पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments