Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावधान : हँकरकडून आरोग्य सेतू अँपचा गैरवापर ; भारतीय सैन्य, नागरिकांचा डेटा चोरीचा प्रयत्न

भारत सरकारच्या अधिकत वेबसाईट https://www.mygon.in वरुन आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करावा

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३ - हँकरने आरोग्य सेतू अँपमधील डाऊनलोड लिंकची छेडछाड करून बनावट आरोग्य सेतू अँप तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. यामुळे भारत सरकारच्या अधिकत वेबसाईट https://www.mygon.in वरुन आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील व नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी केले आहे.


सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. या सूचनाचे नागरिकांकडून शहनिशा न करता पालन केले जात आहे. यामुळे नागरिकांकडून बनावट आरोग्य सेतू अँप डाऊनलोड केला जात असल्याचे निर्दशनास आले आहे. या बनावट अँपच्या माध्यमातून भारतीय सैन्य व भारतीय नागरिकांची माहिती चोरण्यासाठी वापर होत असल्याचे आढळून आले आहे. बनावट आरोग्य सेतू अँपच्या लिंकला क्लिक केल्यास हँकरला तुमचा मोबाईल, लाँपटाँप, संगणक, टँब व इतर ईलेक्ट्राँनिक डिव्हाईस अँक्सेस त्याला मिळतो. त्यावरून हँकरकडून तुमची वैयक्तिक व खाजगी माहिती चोरी करु शकतो. यामुळे नागरिकांनी भारत सरकारच्या अधिकत वेबसाईट https://www.mygon.in वरुन आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करावे, असे जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments