Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावाचा परिसर सील करून तपासणी मोहिम राबवावी ; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची सूचना


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २ - गेल्या ५-६ दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा बाधीत रुग्ण आढळल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या व गावाचा परिसर सील करून तपासणी मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत. 

विनापरवानगी कोणालाही जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश देण्यात येऊ नये,. अधिकृत परवानगी असेल त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी तसेच जिल्हा हद्दीत प्रवेश केल्यावर त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून आणि परराज्यातून अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पाश्वभूमीवर अधिक दक्षतेने जिल्हा सीमेवर तपासणी केली जाणार आहे. 
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १५५९ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४८१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. आजच्या बाधीत रुग्णामध्ये आता कोरोना बाधिताची संख्या ४४ झाली आहे. त्यापैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे. त्यापैकी एक जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहे तर ०२ बाधीत व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
काही दिवसापूर्वी मोहन देवढे गावातील ही व्यक्ती त्याच्या शेतातील शेतमाल घेऊन मुंबईला गेली होती. तेथून परतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल त्यांच्या घशातील स्त्राव घेऊन पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने तात्काळ तालुका प्रशासनाला आदेश देऊन या बाधित व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तीनं शोधून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments