Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सैनिक हे देशाचे खरे "हिरो' - शिवाजीराव कर्डिले


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर,दि.२९: माजी सैनिकांनी देशसेवेसाठी नोकरी केली. प्रत्येकाची सेवा केली. कोरोनाच्या काळात देश संकटात आहे. हे पाहून हे माजी सैनिक पुन्हा देशसेवेसाठी धावून आले आहेत. पोलिसांबरोबर हे माजी सैनिक कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरले आहेत. हे माजी सैनिक देशसेवा म्हणून काम करत आहेत. सैनिक हे देशाचे खरे "हिरो' आहेत. समाजाने त्यांचा आदर्श घ्यायला हवा. शासनाने कोरोना विषय सांगितलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे, असे आवाहन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. 
जीवनातील तारुण्याचा काळ देशसेवेला दिलेल्या माजी सैनिकांनी कोरोना विरुद्धच्या देशाच्या लढ्यातही महत्त्वाची भुमिका बजावली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील 244 माजी सैनिकांनी पोलिसांसमवेत कोरोना विरुद्धच्या लढ्यात काम केले. अशा माजी सैनिकांचा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी स्वखर्चातून एन 95 मास्क व सॅनिटायझर देऊन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गौरव करत कृतज्ञता व्यक्‍त केली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, भिंगार येथील माजी सैनिक बहुउद्देशिय संघटने रामदास गुंड, तैय्यब बेग, सुनील दुसुंगे, शिवाजी पालवे, कुशल घुले, प्रकाश ठोकळ, अमोल धाडगे, सोमनाथ वामन आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments