Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार शुक्रवार बाजारतळ येथील दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी ; कँन्टोमेन्ट सीओना राष्ट्रवादी युवकचे निवेदन

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - भिंगार शुक्रवार बाजारतळ येथील दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांनी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पाश्वभुमीवर सर्वजण सूचनांचे पालन करतील, असेही यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छावणी परिषदेच्या वतीने जे पाऊल उचलले ते अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्या मुळे आज रोजी भिंगार कँन्टोमेन्ट परिसरात एकही रुग्ण आढळून आलेला नाहीं याबद्दल आपले मनपूर्वक आभार ,तरी मागील दोन ते अडीच महिन्या पासून लॉकडवून असल्या मुळे भिंगार बाजार तळा वरील छोटे मोठे उद्योग पूर्ण पने बंद आहेत जिल्हा अधिकारी साहेबांच्या आदेशाने अहमदनगर शहरात कापडबजार सारखे मार्केट सुरू झाले आहेत त्यात कापडाचे, मोबाईल दुकाने, किरनादुकाने,शूज जे दुकाने,भुसार मालाचे दुकाने,फ्रुटचे दुकाने, सर्व दुकानांना परवानगी दिली आहे. भिंगार येथील शुक्रवार बाजार तळा वरील सगळ्या प्रकारचे छोटे मोठे उदयोग चालू करावे व चारही ठिकाणचे बंद केलेले गेट उघडण्यात यावे. जेणेकरून छोटे मोठे व्यापार करणाऱ्या दुकानदारानवर उपासमारीची वेळ येणार नाहीं बाजार बंद असल्या मुळे फ्रुट विक्रेते,भाजीपाला विक्रेते हायवे रोडवर दुकान लावल्या मूळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच कुंभाराचे माठ हे उन्हाळ्यातच विकले जातात तो वर्ष भर कामकरुन उन्हाळ्यात माठ विकले जाते त्याच माल वर्षभर पढुन राहील त्याचे फार नुकसान होईल तरी इतर दुकांनदाराचे सुद्धा नुकसान होत आहे शुक्रवार बाजार तळा वरील दुकानदार हे सोशल डिस्टन्ससिगचे पालन करतील व सँनेटायजर व मास्क चा वापर करतील याची पूर्णपणे हमी देत आहेत. आपण याकडे जातीने लक्ष दयावे व शुक्रवार बाजार येथील दुकाने उघडण्यास परवानगी दयावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments