Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साईचरित्र पारायणास जिल्ह्यात सर्वत्र मोठा प्रतिसाद


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी : - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र विविध प्रकाराने प्रयत्न केले जात आहे, साईभक्तांकडूनही, कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, त्यावर व्हॅक्सीन निर्माण व्हावी, तसेच कोरोना वारियर्स रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांना स्फूर्ती मिळावी, यासाठी शिर्डीतील साई निर्माण ग्रुप, द्वारकामाई प्रतिष्ठान,व साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्यावतीने या लॉकडाउन काळात दर गुरुवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत प्रत्येकाने घरात राहून लकी ड्रॉ मार्फत निघालेला श्री साईचरित्र ग्रंथातील एक अध्याय वाचून व श्री साईबाबांची आरती करून एक आगळेवेगळे श्री साईचरित्र पारायण सुरू केले असून आज गुरुवार दि, 28 मे रोजी या पारायणाचा तिसरा गुरुवार आहे. आज संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात , हजारो साईभक्तांनी आपल्या घरात राहून आपल्या कुटुंबासह श्री साईचरित्र ग्रंथाचेअध्याय पारायण केले. जिल्ह्यात सर्वत्र पारायणाला मोठा प्रतिसाद मिळाला.


जगात,देशात कोरोनाने मोठा हाहाकार घातला असून कोव्हीड 19 या आजारावर अद्यापही लस तयार झालेली नाही, covid-19 या आजारामुळे जगात, देशात दिवसेंदिवस अनेक कोरोना बाधित रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत, यामुळे सर्वच देश हतबल झाले आहेत, अशा परिस्थितीत देशात लॉक डाऊन सुरू आहे, सर्वजण आपापल्या घरात आहेत, कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झाले आहे, अशा परिस्थितीत कोरोना वारियर्स आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहेत, आपले कुटुंब बाजूला ठेवून डॉक्टर्स ,नर्स ,आरोग्य कर्मचारी, महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, विविध क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी हे अहोरात्र काम करत आहे, अशा रात्रंदिवस काम करणा-यांचा सर्वांनाच अभिमान आहे, या सर्व कोरोना वारियर्स यांना स्फूर्ती मिळावी ,त्यांचे कौतुक व्हावे, या हेतूनेच व कोरोणाचा लवकर जगातून, देशातून नायनाट व्हावा, covid-19 यावर लवकर लस निर्माण व्हावी ,यासाठी मोठ्या भक्तिमय भावनेतून, श्रद्धेतून शिर्डीतील साई निर्माण ग्रुप, द्वारकामाई प्रतिष्ठान, साई संदेश प्रतिष्ठान रुई, यांच्यावतीने असे श्री साईचरित्र पारायण सुरू केले आहे, मात्र सामूहिक किंवा मंदिरात पारायण न करता हे पारायण लॉक डाउन मुळे प्रत्येक जण आपापल्या घरात राहून कुटुंबासह करत आहेत, प्रत्येकाने फोनवर संपर्क करून लकी ड्रॉ मध्ये निघालेला अध्याय आपापल्या घरात वाचन करत व आरती करत हे पारायण संपन्न होत आहे, आज दि, 28 मेचा गुरुवार हा या पारायणाचा तिसरा गुरुवार होता, दिनांक 14 गुरुवार रोजी श्री साई चरित्र पारायणाचा पहिला गुरुवार होता, या गुरुवारी शिर्डी व परिसरात पारायण करण्यात आले, त्यानंतर 21 मे ला दुसरा गुरुवार संपूर्ण राहता तालुक्यातील घराघरात श्री साई चरित्र पारायण झाले आणि आज 28 मेचा तिसरा गुरुवार असून आज संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात साईभक्तांनी या लॉकडाउनच्या दरम्यान आपापल्या घरात राहून संपूर्ण कुटुंबासह श्री साईचरित्र ग्रंथाचे पारायण, अध्याय वाचन केले व आरती करत श्री साईबाबांना या कोरोनाचा नायनाट होवो, म्हणून मनोमन साकडे घातले, आज तिसऱ्या गुरुवारी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील, गावागावातून ,घराघरातून श्री साईभक्तांचा या पारायणला मोठा प्रतिसाद मिळाला, पुढच्या गुरुवारी दि,४मेला संपूर्ण देशांमधील, सर्वच राज्यातील सर्व जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात साईभक्तांकडून श्री साईचरित्र पारायण, अध्याय वाचन होणार आहे, त्यानंतर 11 जून रोजी संपूर्ण जगात करोडो साईभक्त श्री साईचरित्र पारायण करणार आहेत, या पारायणाला विविध ठिकाणाहून मोठा प्रतिसाद मिळत आहे, पुढील गुरुवारी देशातील साईभक्तांनी या पारायणात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा ,असे आवाहन साई निर्माण ग्रुप, द्वारकामाई प्रतिष्ठान व साई संदेश प्रतिष्ठान रुई यांनी व विजय कोते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments