Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजीविक्री करणारी महिला कोरोना पॉझिटिव्ह

  

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी : शिर्डी लगतच असणाऱ्या निमगाव येथे पन्नास वर्षे भाजी विक्री करणा्या महिलेला कोरोना झाल्याची पुष्टि झाली असून या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे शिर्डी व परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी व परिसर आत्तापर्यंत कोरोणा मुक्त होता. मात्र निमगाव येथील महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच राहता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे, येथिल प्रशासन व कोरोणा वारियर्स युद्धपातळीवर कार्यरत झाले आहे ,राहता तालुक्यातील व शिर्डी नजीक असणाऱ्या निमगाव कोऱ्हाळे येथिल ही महिला भाजीविक्रीचे काम करते. निमगाव व सावळीविहिर आदी परिसरात ही महिला भाजी विक्री चे काम करत होती, तिला खोकला सर्दीअशी कोरोणा सारखी लक्षणे आढळली, मात्र ती शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेली होती, तीन दिवस या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले होते, यावेळी हॉस्पिटलमधील दहा ते अकरा आरोग्य कर्मचारी तिच्या संपर्कात आले असल्याचे समजते, तसेच तिच्या घरातील सात ते आठ,व्यक्ती तिच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे काही नातेवाईक व भाजी घेणारे ग्राहक या महिलेच्या संपर्कात आल्याचे माहिती मिळत आहे, काहीना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले आहे असे समजते, या महिलेचे लक्षणे covid-19 सारखे दिसत असल्यामुळे तिला अहमदनगरला पाठवण्यात आले होते. तेथे श्राव घेऊन कोरोना तपासणी करण्यात आली ,बुधवारी सायंकाळी हा रिपोर्ट आल्यानंतर व या महिलेला कोरोना झाल्याचे समजताच संपूर्ण निमगाव तसेच राहता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत राहता तालुक्यात, शिर्डी व परिसरात एकही कोरोना रुग्ण नव्हता, मात्र ही महिला कोरोनाबाधीत आढळल्याने राहाता।तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे, निमगाव येथे प्रशासनाचे आधिकारी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, सर्व वैद्यकीय अधिकारी ,तहसीलदार कुंदन हिरे, राहता तालुका पंचायत समितीचे बी,डि,ओ समर्थ शेवाळे तसेच पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, आदींसह सर्व शासकीय कर्मचारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, कामगार तलाठी या सर्वांची रात्रीच मिटिंग होऊन निमगाव व परिसरात या महिलेच्या संपर्कात कोणकोण आले आहेत. त्यांचा तपास सुरू झाला आहे. या महिलेच्या घरातही सात-आठ व्यक्ती असल्याचे समजते ही महिला भाजीविक्रेता असल्यामुळे तिच्या संपर्कात अनेकजण येण्याची शक्यता असून या सर्वांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे व संपर्कात आलेल्यांना अहमदनगरला तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे, तसेच निमगावात रात्रीपासूनच आज गुरुवारी सकाळी संपूर्ण गाव सॉनेटांयशन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गावात येणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. शिर्डी व परिसरात पहिला कोरोणाचा रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे, तालुक्यातील नागरिकांनी किंवा निमगाव येथील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, सर्व यंत्रणा सुसज्ज आहे. सर्वांनी सोशल डिस्टंन्स, मास्क वापरावेत, विनाकारण बाहेर फिरू नये, गर्दी करू नये. प्रत्येकाने दक्षता घ्यावी, घरात रहा सुरक्षित रहा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान कोरोणा बाधित महिला भाजी विक्रीचा धंदा निमगाव प्रमाणेच सावळविहीर येथे करत असल्याची माहिती मिळत असून त्यामुळे निमगाव निघोज सावळीविहीर हा परिसर पूर्ण बंद करण्यात आलेआहे, सर्व दुकाने बंद आहेत , तसेच निमगाव निघोज लगतच्या परिसरातील साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टी देण्यात आल्याचे समजते ,शिर्डी व परिसरात प्रथमच कोरोना रुग्ण सापडल्यामुळे लॉक डाउन चे नियम कडक करण्यात आले आहे, निमगाव हे शिर्डी लागत असल्यामुळे शिर्डी शहरातही लॉक डाऊन चे नियम कडक करण्यात आले असून शिर्डी व परिसरात प्रशासन मोठी दक्षता घेत आहे.लवकरच येऊ परिसरातील साईभक्तांसाठी साई मंदिर उघडण्याचे प्रयत्न सुरू होते, तसेच परिसरातील ठराविक वेळेत काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र निमगावात करोना रुग्ण सापडल्यामुळे आता सर्व बंद करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments