Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारला मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वायला ; तातडीने दुरुस्ती न झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२७ - भिंगार शहरातील खळेवाडी येथील मुख्य रस्त्यावर पम्पिंग स्टेशनला जाणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वायला जात आहे. या ठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने नेहमीच अपघात होत आहेत. या परिस्थितीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून ही कुणीच याची दाखल घेत नाही अशी खंत येथील रहिवाश्यांनी नगर रिपोर्टर शी बोलताना व्यक्त केली आहे.

आता मुलांच्या शाळा सुरु होणार असल्यामुळे जवळच भिंगार हायस्कुल असून मुलं या ठिकाणीहून नेहमीच ये -जा करत असतात. त्यामुळे मुलांच्या जीवाला सुद्धा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पालकांनी म्हटले आहे. यामुळे या ठिकाणाची जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments