Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आणखी २ रुग्ण कोरोनामुक्त ; जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४


आँंनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २४ - नगर शहरातील सारस नगर येथील एक आणि सुभेदार गल्ली येथील एक असे दोन रुग्ण आज कोरोना मुक्त झाले. त्यांना आज अलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र सारसनगर आणि सुभेदार गल्ली परिसर कंटेनमेंट झोन असल्याने त्यांना याच रुग्णालयात दुसऱ्या वॉर्ड मध्ये ठेवण्यात येणार आहे यामुळे आता कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. दरम्यान, आज सायंकाळी ११ व्यक्तींचे अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मधून प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

दरम्यान, आज सकाळी ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या त्यापैकी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील व्यक्ती जिल्ह्यातीलच असल्याने बाधित रुग्णांची संख्या आता ७५ झाली आहे. याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सात इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत २००२ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासले असून त्यापैकी १८७५ निगेटिव्ह आले आहेत. तर १४ स्त्राव नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही. नऊ व्यक्तींचे अहवाल रिपीट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १८ जण उपचार घेत असून तीन जण नाशिक येथे उपचार घेत आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ७५ असून त्यापैकी ५४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर ०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मनपा आणि तालुकानिहाय आढळलेले रुग्ण, डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
अहमदनगर मनपा- एकूण रुग्ण २१, डिस्चार्ज १३, मृत्यू ०१.
नगर ग्रामीण- एकूण रुग्ण ०३, डिस्चार्ज ०३, मृत्यू ००.
जामखेड - एकूण रुग्ण १७, डिस्चार्ज १६, मृत्यू ०१.
संगमनेर- एकूण रुग्ण २५, डिस्चार्ज १६, मृत्यू ०३.
नेवासा- एकूण रुग्ण ०४, डिस्चार्ज ०४, मृत्यू ००.
राहता- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ०१, मृत्यू ००.
कोपरगाव- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ००, मृत्यू ०१.
पाथर्डी- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ०१, मृत्यू ००.
पारनेर- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ००, मृत्यू ०१.
श्रीरामपूर- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ००, मृत्यू ००. 

Post a Comment

0 Comments