Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुपचूप राहल्याने संगमनेरच्या दाम्पत्यावर भिंगार कँम्प ठाण्यात गुन्हा दाखल


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.२ : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाँकडाऊन असतांना विनापरवाना प्रवास करून भिंगारगावात गुपचूप राहत असल्याने भिंगार कँप पोलिसांनी संगमनेर येथील एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पंकज पांडुरंग चव्हाण व अर्चना पंकज चव्हाण ( रा.संगमनेर जि.अ.नगर) अशी त्यांची नावे आहेत.
ही दोघेही त्यांच्या दोन मुलांसह खळेवाडीतील देवनगरी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गुपचूप राहात असल्याची माहिती गावात गस्त घालतांना कँप पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली.
याची कार्यतत्परता दाखवत सपोनि प्रविण पाटील,स.फौ.आर एस मुळे,पो.ना.आर एन कुलांगे,पोलिस कर्मचारी सचीन धोंडे यांनी देवनगरी येथे जाऊन चौकशी केली असता सत्य समोर आले. पंकज व अर्चना हे दोघेही आपल्या सहा व तीन वर्षाच्या मुलांसह संगमनेर येथून अल्टो कार (क्रमांक17 EA3450) मधून प्रवास करुन विनापरवाना येवून येथे गुपचूप राहात असल्याची कबुली दिली.तसेच त्यांनी शासकीय रुग्णालयात स्वतःची तपासणी देखील केली नाही.
खळेवाडी देवनगरी परिसरात फिरून मानव जीवीतास धोकादायक असलेल्या कोव्हिड 19 विषाणूचा संसर्ग पसरविण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.असे माहिती असून सुद्धा कोणत्याही ठोस अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी फिरून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केला. याप्रकरणी पो ना. रघुनाथ कुलांगे यांनी
दिलेल्या फिर्यादीवरून कँप पोलिसांनी या दाम्पत्या विरुद्ध भादवि २६९,२७०,१८८,सह साथीचे रोग प्रतिबंध कायदा १८९७ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments