Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर एमआयडीसीत परराज्यातील कामगारावर उपासमारीची वेळ ; आमच्या घरी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत करावी, रोहित कुमार याची मागणी

सुविधा न झाल्यास घराकडे पायी निघण्याची सर्व परराज्यातील कामगारांचा निर्धार !
आँँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२ - येथील एमआयडीसीतील सनफार्म कंपनीसह अन्य ठिकाणी काम करणारे परराज्यातील वडगाव गुप्ता येथे असणाऱ्या १५०च्या आसपास कामगारावर उपासमारीची वेळ आल्याने आपआपल्या घरी त्या सर्वांना जायाचं आहे. परंतु या सर्व कामगारांना कंपनी अथवा ठेकेदारांकडून कामाचा मोबादल मिळाला नाही. यामुळे या सर्व परराज्यातील कामगाराच्या कुटुबांना मोठा त्रास सहान करावा लागत आहे. येथील जिल्हा प्रशासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी रोहित कुमार यांनी 'नगर रिपोर्टर' शी बोलताना केली आहे.


नगर एमआयडीसी येथील वडगाव गुप्ता या ठिकाणी झारखंड, युपी, बिहार, राज्यस्थान, बंगाल यासह अन्य ठिकाणाहून नगर एमआयडीसीत कामासाठी परराज्यातील कामगार आले आहेत. या कामगारांना लाँकडाऊन काळातील पैसे देऊ असे म्हटले. परंतु अद्यापही कंपनी अथवा ठेकेदाराकडे वारंवार मागणी करुन ही कामाचे पैसे मिळाले नाही. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व कुटुंबाचे मोठे हाल सुरू झाले आहेत. या परराज्यातील कामगारांना कंपनी अथवा संबंधित ठेकेदारकडून कोणतीही मदत होत नसल्याने सर्व कामगार त्रस्त झाले आहेत. यात वडगाव गुत्पा येथील सर्व परराज्यातील कामगारांना कंपनी अथवा ठेकेदारकडून पगार मिळाला नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे काहींनी आपल्या घरी पायी जाण्यासाठी ठरवले आहे. या संकटातून आम्हाला वाचवण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने मदत करावी, अशी प्रतिक्रिया रोहित कुमार यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments