Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत असल्याबाबत जिल्हाधिऱ्यांना निवेदनआँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१९ : भाजपातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना मंगळवारी( दि.19) देण्यात आले. यावेळी आंदोलनचे नेतृत्व करणारे भाजपाचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी खा. दिलीप गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, महापौर बाबासाहेब वाकळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शामराव पिंपळे, विवेक नाईक, वंसत लोढा, सचिन पारखी आदी उपस्थित होते.
कोविड १९ महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील कोरोनाचा विळखा आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. 
केंद्रसरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टिका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. सरकारला लवकरात लवकर जाग यावी, आणि तातडीने उपाययोजना कराव्यात. यासाठी भाजपातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments