Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरातील माळीवाड्यासह अन्य भाग बफर झोन जाहीर


आँंनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर : शहरातील सुभेदार गल्ली व सारसनगर भागात सात रुग्ण सापडताच नगर शहरातील माळीवाड्यासह मोठा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना फिरण्यास, तसेच दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे. शनिवारी (दि.१६) दुपारी या परिसरापासून दोन किलोमीटर हवाई अंतर असलेला परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तो 27 मेपर्यंत बफर झोन राहणार आहे. 

कोरोनाचा रुग्ण आढळला, अशी अफवाही काही काळ या परिसरात पसरली होती. पोलिस प्रशासनाने हा परिसर बफर झोन म्हणून "सील' करीत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात नागरिक व दुकानांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ड्रोनचीही मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होणार आहे.
आदेशामुळे शहरातील माळीवाडा, वाडिया पार्क, पंचपीर चावडी, जुना बाजार, वसंत टॉकीज चौक, माणिक चौक, आशा टॉकीज चौक, नवी पेठ, कापड बाजार, अर्बन बॅंक रस्ता, गांधी मैदान, चितळे रस्त्याचा अर्धा भाग आदी ठिकाणे "सील' करण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments