Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सारसनगर उपनगरामधील ओम कॉलनीतील नागरिकांच्या समस्या आ.संग्राम जगताप यांनी जाणून घेतल्या समस्या


तातडीने सोडवण्याच्या मनपाच्या कर्मचाऱ्यांना आ.जगतापांनी दिले आदेश 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : शहरात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे.त्यामुळे शहरातील रस्ते जलमय होऊन ठिकठिकाणी पाणी जमा झाले आहे.रस्ते आधीच खराब आहेत. त्यात आता पावसाच्या पाण्याने आणखी खराब होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. रस्त्यांत मोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याचीही शक्यता आहे. 
अहमदनगरच्या सारसनगर उपनगरामधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ.संग्राम जगताप यांनी आज ओम कॉलनी येथे भेट दिली. पाण्याची,रस्त्याची समस्या येथील नागरिकांनी आमदारासमोर मांडली.यावर तात्काळ निर्णय घेऊन कामास सुरुवात करण्यात आली,तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणची कामे मार्गी लावा असे आदेश देण्यात आले.
काल झालेल्या पावसामुळे सारसनगरमधील ओम कॉलनीत रस्त्याने चालणे देखील मुश्किल झाले आहे. एवढी रस्त्याची दुर्दशा झालेली पाहून आणि बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संग्राम जगताप यांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याचे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, पाणीपुरवठा विभागाचे इंजिनिअर राहुल गिते, ओम कॉलनीतील नितीन मुथ्था, नारायण कर्डीले, उत्तम गव्हाणे, विकी शेकडे, संतोष कराळे,सचिन मोरे,संजय दहातोंडे, निवृत्ती शिरसम आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments