Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महामार्गावर वाहन अडवून चालकास मारहाण करुन लुटणारी टोळी जेरबंद


स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव उपविभागिय पोलिसांची संयुक्त कारवाई
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.14 : महामार्गावर वाहन अडवून चालकास मारहाण करुन लुटमार करणारी टोळी जेरबंद केले स्थानिक गुन्हे शाखा व  शेवगांव विभाग उपविभागिय पोलिस अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून 9 लाख रुपये किंमतीचा टेम्पो (नं.एमएच 16, सी.सी.3708) हा जप्त केला आहे.
आरोपीमध्ये जाकीर सुभान शेख (वय 24 रा.फुंदे टाकळी, ता.पाथर्डी), शंकर नारायण फुंदे (वय 26ए रा.फुंदे टाकळी, ता.पाथर्डी), रुपंचद श्रीधर आंधळे (वय 28, रा.जिरेवाडी ता.पाथर्डी), गोकुळ राधाकिसन फुंदे (वय 25, रा.फुंदे टाकळी, ता.पाथर्डी) यांना वेगवेगळ्या ठिकाणवरुन ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.13 मे रोजी मुकेश कूमार जयस्वाील (वय 27, धंदा ट्रक ड्रायव्हर, रा.घुलेवाडी फाटा, संगमनेर, ता.संगमनेर) हे त्यांची ताब्यातील ट्रक (नं.एमएच15-डी.के.6600 ) ही घेवून क्लिनर कमालमुद्दीन इद्रीसी याचेसह नांदेड येथून परभणी, माजलगांव, गढी, खरवंडी, पाथर्डी, नगर मार्गे संगमनेर येथे जात असताना दुपारच्या सुमारास टाकळी फाटा (ता.पाथर्डी ) येेथे आले असता पाठीमागून टेम्पो (नं.एमएच 16 सीसी 6708 ) यामधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी जयस्वाल यांना टेम्पो आडवा लावून ट्रक अडवून मारहाण केली. तसेच त्याच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल व गाडीतील टेपरेकॉर्डर असा एकूण 30हजार रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला. त्याबाबत त्यांनी पाथर्डी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी वरिष्ठांचे आदेशानुसार गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमून तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकातील पोलिस नाईक संतोष लोंंढे, रविंद्र कर्डिले, रवि सोनटक्के, प्रकाश वाघ, रविंद्र घुगासे, विनोद मासळकर, जालिंदर माने यांनी तात्काळ पाथर्डी येथे जावून फिर्यादीची भेट घेवून माहिती घेतली.
यानंतर उपविभागयी पोलिस अधिकारी शेवगांव तसेच त्यांचे कार्यालयातील पोलिस कॉस्टेबल सागर बुधवंत, संदीप चव्हाण, रत्नपारखी, अरविंद चव्हाण, काकासाहेब राख, तांबे यांनी सर्वानी मिळून गुन्हयातील आरोपीचा शोध घेतला. यामध्ये माहितीच्या आधारावर त्यांनी जाकीर सुभान शेख (वय 24 रा.फुंदे टाकळी, ता.पाथर्डी) याने त्यांच्या साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. जाकीरला ताब्यात घेतल्यावर त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली, त्यास विश्‍वासात घेवून विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा  शंकर नारायण फुंदे (वय 26ए रा.फुंदे टाकळी, ता.पाथर्डी), रुपंचद श्रीधर आंधळे (वय 28, रा.जिरेवाडी ता.पाथर्डी), गोकुळ राधाकिसन फुंदे (वय 25, रा.फुंदे टाकळी, ता.पाथर्डी) यांनी मिळून केल्याची कबुली दिली. यानंतर वेगवेगळ्या ठिकाणवरुन ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलिस अधिक्षक सागर पाटील यांच्या सुचनेनुसार शेवगांवचे उपविभागयी मंदार जावळे व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली.    

Post a Comment

0 Comments