Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील कोरोना योध्यांसाठी आ. राजळेकडून २८ लक्ष रूपयांच्या वैद्यकिय साहित्य व संरक्षण उपकरणांचे वितरण

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - राज्यात कोरोना साथ रोगाचा वाढता प्रार्दुभाव पाहता मतदारसंघातील यंत्रणा सज्ज व अद्यावत राहणेसाठी शासनाचे धारणाप्रमाणे आमदार मोनिका राजळे यांनी स्थानिक विकासनिधी कार्यक्रमांतर्गत शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शासकिय रूग्णालये, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, तसेच पोलिसयंत्रणा, प्रशासकीय विभाग, नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी यासारख्या कोरोना साथ रोगाविरूध्द लढणाऱ्या कारोनायोध्यांना वैद्यकिय साहित्य व संरक्षण उपकरणचे वितरण करण्यात आले.

शेवगांव – पाथर्डी मतदारसंघ पाथर्डी तालुक्यातील कारोना पॉझिटिव्ह रूग्णाचा अपवाद वगळता प्रशासकिय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे व नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित आहे. यावेळी सर्व डॉक्टर्स, आरोग्य विभागातील परिचारिका, सर्व आरोग्य कर्मचारी तसेच प्रशासकिय यंत्रणेतील महसुल कर्मचारी, अधिकारी, पोलिस कर्मचारी, दोनही नगरपरिषदेतील कर्मचारी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका व विविध शासकिय विभागातील कर्मचारी हे रात्रों दिवस आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत आहेत, त्यांचे सेवाव्रत चालु असतांना या योध्यांच्या स्वसंरक्षणात्मक साहित्याचा तुटवडा भासत आहे. याचप्रमाणे रूग्णालयामध्ये खबरदारीचा उपाय म्हणुन सज्ज राहण्यासाठी व अद्यावत वैद्यकिय सुविधा देण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याने आमदार मोनिका राजळे यांनी शासन निर्णयानुसार आपल्या स्थानिक विकास निधीतुन वैद्यकिय साहित्य व उपकराणांची उपलब्धता करून दिली, यामध्ये *उपजिल्हा रूग्णालय पाथर्डी यांचेकरिता ICU व्हेंटीलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, सक्सेशन मशिन, सेमी फाऊलर बेड, ऑक्सीजन फ्लोमेटर एक्सेसरी, ऑक्सीजन सिलींडर, डिफेरीलेटर त्याचप्रमाणे शेवगांव ग्रामीण रूग्णालयासाठी ECG मशिन व साहित्य देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर्स यांचेकरिता PPE किट, N95 मास्क तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील परिचारिका, अरोग्य सेविका, आशास्वयंसेविका, मेडीकल स्ट्राफ, पोलिस कर्मचारी, महसुल कर्मचारी व इतर शासकिय विभागातील कोरोना प्रतिबंधात्मक पथकामध्ये ऑन ड्युटी काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचेकरिता 24 हजार फेसमास्क, 2 हजार हॅन्डसॅनिटायझर, 16हजार सहाशे हॅन्डग्लोज असे रूपये 27 लाख 87 हजार किंमतीचे* साहित्यांचे वाटप आजपासुन सुरू करण्यात आले. 
प्राथमिक स्वरूपात उपजिल्हा रूग्णालय पाथर्डी व तहसिल कार्यालय पाथर्डी येथे आमदार मोनिका राजळे यांचे उपस्थितीत या साहित्यांचे वाटप करण्यात आले, यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक कराळे, पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गोकुळ दौड, रवींद्र वायकर, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, विष्णुपंत अकोलकर, नगरसेवक रामनाथ बंग, मंगल कोकाटे, अनिल बोरुडे, बबन बुचकुल, अजय भंडारी, संतोष गटानी, आदीनाथ धायतड्क आदी मान्यवर उपस्थित होते, उर्वरित वैद्यकिय उपकरणे व साहित्यांचे वाटप तात्काळ मतदारसंघात करण्यात येणार असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments